Mumbai Trans Harbour Link Bridge: समुद्राच्या पोटातून प्रवास, भारतातील सर्वात लांबीचा सागरी पुल; नव्या सागरी सेतूचे भन्नाट PHOTOS

MTHL Bridge Atal Setu Latest Photos: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे शुक्रवारी म्हणजेच 12 जानेवारी रोजी लोकार्पण होत आहे. अटल सेतू उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. हा नवीन पूल कसा आहे? याबाबत अनेक उत्सुकता आहे. अटल सेतूचे काही निवडत फोटो. 

| Jan 12, 2024, 09:43 AM IST

MTHL Bridge Atal Setu Latest Photos: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे शुक्रवारी म्हणजेच 12 जानेवारी रोजी लोकार्पण होत आहे. अटल सेतू उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. हा नवीन पूल कसा आहे? याबाबत अनेक उत्सुकता आहे. अटल सेतूचे काही निवडत फोटो. 

1/8

समुद्राच्या पोटातून प्रवास, भारतातील सर्वात लांबीचा सागरी पुल; नव्या सागरी सेतूचे भन्नाट PHOTOS

PM Narendra Modi to inaugurate Mumbai Trans Harbour Link  All about Indias longest sea bridge

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. 23 किमी लांबीच्या या पुलामुळं मुंबई आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण होणार आहे. या पुलाचे ठळक वैशिष्ट्ये जाणून घ्या. (फोटो सौजन्यः Ujwal Puri // ompsyram.eth)

2/8

नवी मुंबईला जोडणार

PM Narendra Modi to inaugurate Mumbai Trans Harbour Link  All about Indias longest sea bridge

शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्ग दोन शहरांना जोडणार आहे.  तर, या पुलामुळं मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास अवघ्या 30 मिनिटांत पूर्ण होणार आहे. (फोटो सौजन्यः Ujwal Puri // ompsyram.eth)

3/8

पुणे 90 मिनिटांत गाठा

PM Narendra Modi to inaugurate Mumbai Trans Harbour Link  All about Indias longest sea bridge

मुंबई ते पुणे अंतर 90 मिनिटांत गाठता येणार आहे. पुल सुरू झाल्यानंतर मध्य मुंबईतून सेवरी ते नवी मुंबईच्या चिरलेपर्यंतचा प्रवास अगदी 15 ते 20 मिनिटांत होणार आहे

4/8

वेगवान प्रवास

PM Narendra Modi to inaugurate Mumbai Trans Harbour Link  All about Indias longest sea bridge

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प NH 348 या राष्ट्रीय महामार्गाशी जोडला जाणार आहे.  हा मार्ग पुढे मुंबई-पुणे एक्स्प्रेसने उड्डाणपुलावरून चिर्लेहुन ते पळस्पे फाट्यापर्यंत जोडला जाईल. (फोटो सौजन्यः Ujwal Puri // ompsyram.eth)

5/8

समुद्रातून प्रवास

PM Narendra Modi to inaugurate Mumbai Trans Harbour Link  All about Indias longest sea bridge

या पुलावरुन प्रवास करताना वाहनाचा वेग ताशी 100 किमी वेग मर्यादा पाळावी लागेल.हा पूल सहा पदरी असून 16.50 किलोमीटर मार्ग समुद्रातून तर 5.5 किलोमीटरचा भाग हा जमिनीवर आहे. 

6/8

वेगमर्यादा

PM Narendra Modi to inaugurate Mumbai Trans Harbour Link  All about Indias longest sea bridge

पुलावर चढताना आणि  उतरताना वेग 40 किमी प्रतितास इतका मर्यादित आहे. अपघात रोखण्यासाठी भारतातील सर्वात लांब समुद्रमार्गे वेग मर्यादा लागू करण्यात आली आहे.

7/8

टोल किती

PM Narendra Modi to inaugurate Mumbai Trans Harbour Link  All about Indias longest sea bridge

 शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवरून प्रवास करण्यासाठी 250 रुपये टोल आकारण्यात येणार आहे.

8/8

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक

PM Narendra Modi to inaugurate Mumbai Trans Harbour Link  All about Indias longest sea bridge

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळं इंधनाची बचत होणार आहे.