3 वर्षांची असताना वडिल गेले, आईने मजूरी केली... आता ओळखली जाते टीम इंडिया प्रती झुलन गोस्वामी

Womens Team India : दक्षिण आफ्रिकेत महिला टी20 वर्ल्ड कप (Womens T20 World Cup) सुरु आहे. स्पर्धेत सलग दोन सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाला (Team India) इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने भारताचा 11 धावांनी पराभव केला. सामना हरला असला तरी या सामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते टीम इंडियाची मध्यमगती गोलंदाज रेणूका ठाकूरने (Renuka Thackur). या सामन्यात रेणूकाने तब्बल 5 विकेट घेतल्या. रेणूकाला टीम इंडियाची प्रती झुलन गोस्वामी (Zulan Goswami) म्हणूनही ओळखलं जातं. विशेष म्हणजे पहिल्या महिला प्रीमिअर लीगमध्येही (WPL) रेणूकाने दीड कोटीचा टप्पा पार केला. 

Feb 20, 2023, 16:47 PM IST
1/8

महिला टीम इंडियाच महान गोलंदाज झुलन गोस्वामी निवृत्त झाल्यानंतर तिची जागा घेणार असा प्रश्न निर्माण झाला होता. पण रेणूका ठाकूरने (Renuka Singh) टीम इंडियात एन्ट्री केली आणि वेगवान गोलंदाजीचा प्रश्न सुटला. 27 वर्षांची रेणूका आता टीम इंडियाची प्रमुख वेगवान गोलंदाज बनली आहे. 

2/8

टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या (England) सामन्यात रेणूका ठाकूर झळकली. 4 षटकात रेणूकाने केवळ 15 धावा देत तब्बल 5 विकेट घेतल्या. टी20 पाच विकेट घेण्याची ही तिची पहिली वेळ ठरलीय. टी20 मध्ये आतापर्यंत खेळलेल्या 30 सामन्यात तीने 30 विकेट घेतल्या आहेत.तर 7 एकदिवसीय सामन्यात तिच्या नावावर 18 विकेट जमा आहेत.

3/8

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर रेणूका ठाकूरवर पहिल्या महिला प्रीमिअर लीगमध्येही मोठी बोली लागली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मोठी बोली लावत रेणूकाला आपल्या संघात घेतलं. रेणूकासाठी फ्रँचाईजीमध्ये चांगलीच चढाओढ लागली होती. पण आरसीबीने तिच्यावर तब्बल 1.50 कोटींची बोली लावली.

4/8

महिला प्रीमिअर लीगमध्ये इतकी मोठी किंमत मिळाल्याने रेणूका ठाकूरच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून बोली लागल्यानंतर रेणूका आणि तिच्या मैत्रिणींनी जल्लोष केल्याचं या व्हिडिओत दिसतंय. 

5/8

इतकंच नाही तर रेणूका राहात असलेल्या गावातही तिच्या आईने मिठाई वाटून आनंद साजरा केला. गावात प्रत्येकाला रेणूकावर अभिमान आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्या गावातील मुलीच्या यशाचा आनंद ओसंडून वाहतोय.

6/8

हिमाचल प्रदेशमधल्या (Himachal Pradesh) परसा गावात रेणूकाचा जन्म झाला. रेणूका 3 वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. 

7/8

आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही रेणुकाच्या आईने आपल्या मुलीच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. लहानपणापासून रेणूकाला क्रिकेटची आवड होती. तिच्या आवडीला आईनेही नेहमीच पाठिंबा दिला. आपल्या आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता मजूरी करत रेणूकाला नेहमीच प्रोत्साहन दिलं.

8/8

पहिला महिला क्रिकेट प्रीमिअर लीगमध्ये रेणूकावर 1.50 रुपयांची बोली लागल्याची बातमी ऐकताच रेणुकाच्या आईचा आनंद गगनात मावत नव्हता. मुलीने आपल्या आईची मेहनत वाया जाऊ दिली नाही. आईनेही मिठाई वाटत संपूर्ण गावाचा तोंड गोड केलं.