'ही' आहे पाकिस्तानची नवी ऐश्वर्या राय, होतेय प्रचंड VIRAL

सोशल मीडियावर व्हायरल होतोय ऐश्वर्या रायच्या हमशक्लचा व्हिडीओ. तोच चेहरा, तेच डोळे पाहून चाहते देखील थक्क झालेत. कोण आहे ऐश्वर्याची हमशक्ल? जाणून घ्या सविस्तर 

| Dec 11, 2024, 13:19 PM IST
1/7

पाकिस्तानची ऐश्वर्या राय

सोशल मीडियावर सतत कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटींचे हमशक्ल बघायला मिळत असतात.  परंतु, सध्या पाकिस्तानमध्ये ऐश्वर्या रायची हमशक्ल पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. 

2/7

उद्योजक कंवल चीमा

पाकिस्तानी उद्योजक कंवल चीमा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ती ऐश्वर्या राय बच्चन सारखी दिसत आहे. 

3/7

हमशक्ल

कंवल चीमा यांचे डोळे, चेहरा आणि आवाज हा ऐश्वर्या राय सारखा  आहे. त्यामुळे तिच्या लुकची तुलना ही ऐश्वर्या रायसोबत केली जात आहे. 

4/7

माई इम्पैक्ट मीटर

सोशल मीडियावर कंवल चीमा यांचे फोटो पाहून चाहत्यांना देखील आश्चर्य वाटत आहे. कंवल या पाकिस्तान उद्योजक संघटनेच्या अध्यक्षाही आहेत. माई इम्पैक्ट मीटर कंपनीच्या CEO आहेत. 

5/7

जन्म

कंवल चीमा यांचा जन्म हा पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे झाला आहे. त्यानंतर ती तिच्या आई-वडिलांसोबत सऊदी अरबची राजधानी रियाद स्थायिक झाल्या. 

6/7

शिक्षण

कंवल यांचे सुरुवातीचे शिक्षण हे पाकिस्तानमध्ये झाले. त्यानंतर रियाधमधील अमेरिकन आणि ब्रिटिश शाळांमध्ये त्यांनी दुसरी ते आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले. 

7/7

पत्रकार प्रश्न

एकदा पाकिस्तानच्या पत्रकाराने कंवल यांना विचारले होते तुमची तुलना बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत करतात. त्यावर त्यांनी उत्तर देणे टाकळे होते. त्यांना ते आवडत नाही असं देखील म्हणाल्या होत्या.