गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असणे योग्य की अयोग्य? प्रेमानंद महाराजांनी दिला खास सल्ला

वृंदावनमधील प्रसिद्ध संत प्रेमानंद जी महाराज यांचे विचार आणि प्रवचने पाहणे आणि ऐकणे आवडते. अलिकडेच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांनी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असणे योग्य की अयोग्य हे सांगितले आहे. 

Soneshwar Patil | Feb 06, 2025, 18:02 PM IST
1/7

वृंदावनमधील प्रसिद्ध संत प्रेमानंद जी महाराज यांचे विचार लोकांना प्रेरणा देतात आणि त्यांचे जीवन योग्य दिशेने बदलण्यासाठी प्रेरित करतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

2/7

ते अनेकदा आजच्या तरुण पिढीबद्दल चांगले विचार मांडताना दिसतात. अलीकडेच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ज्यात त्यांनी सध्याच्या तरुणाईच्या प्रेम जीवनाबद्दल सांगितले आहे.

3/7

ज्यामध्ये एका भक्ताने प्रेमानंद जी महाराज यांना विचारले होते की, आजच्या काळात चार-पाच गर्लफ्रेंड ठेवणे योग्य आहे की अयोग्य? यावर प्रेमानंद जी महाराज काय म्हणाले जाणून घेऊयात. 

4/7

प्रेमानंद जी महाराज म्हणाले की, प्रत्येक मुलाला चार-पाच गर्लफ्रेंड असतात. ज्यामध्ये एक मुलगी चार मुलांशी ब्रेकअप करून नवीन बॉयफ्रेंड बनवते. हे सर्व काय आहे. हे अशुद्ध विचार आहेत. 

5/7

त्यामुळे चार-पाच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड असणे हे चारित्र्यहीनता, ब्रम्हचर्यहीनता आणि अशुद्ध आचरण आहे. असे मुलं उच्च पदावर पोहोचले तरी त्यांना सुख आणि शांती मिळू शकत नाही असं त्यांनी सांगितले. 

6/7

सध्या शेकडो लोक त्यांच्या वासना पूर्ण करण्यासाठी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बनवतात. त्यामुळे खूप विचारपूर्वक एखाद्याशी मैत्री करा.

7/7

आपण आपले मित्र खूप काळजीपूर्वक निवडले पाहिजेत. खरा मित्र तो असतो जो समोरच्या व्यक्तीला आनंदी ठेवण्यासाठी स्वत:चा त्याग करतो. पण सध्या काही मित्र त्यांच्या वासना पूर्ण करण्यासाठी मित्र बनतात.