परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पत्नी क्योको आहे तरी कोण? अगदी फिल्मी आहे लव्ह स्टोरी; 6000 KM दूर माहेर

Did You About Indian Foreign Minister Japanese Wife: भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणून जगभरामध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याची पत्नी मूळची जापानी आहे हे तुम्हाला माहितीये का? यापेक्षा आश्चर्य वाटावी अशी या दोघांची लव्ह स्टोरी आहे. त्याचबद्दल जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Feb 06, 2025, 13:59 PM IST
1/11

jaishankarkyokolovestory

जगभरात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या परराष्ट्रमंत्र्यांची पत्नीच जपानी आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले. पण हे खरं आहे. जाणून घेऊयात त्यांच्या हटके लव्ह स्टोरीबद्दल...

2/11

jaishankarkyokolovestory

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे त्यांची भाषणं आणि हजरजबाबीपणासाठी जातात. जगभरामध्ये भारताचा चेहरा म्हणून वावरणाऱ्या एस. जयशंकर यांची लव्हस्टोरीही फारच रंजक आहे.   

3/11

jaishankarkyokolovestory

जवाहरलाल नेहरु विद्यापीठामधून म्हणजेच जेएनयूमधील एमफील आणि पीएचडीपर्यंत शिक्षण घेतलेल्या जयशंकर यांची पत्नी क्योको जयशंकर या मूळच्या जपानी आहेत. लग्नानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि त्या भारतातच राहू लागल्या.

4/11

jaishankarkyokolovestory

जयशंकर यांच्या पत्नीचं लग्नापूर्वीचं नाव क्योको सामेकावा असं होतं. लग्नानंतर त्यांनी आपलं अडनाव जयशंकर असं लिहिण्यास सुरुवात केली. क्योको या एस. जयशंकर यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. एस. जयशंकर यांची पहिली पत्नी शोभा यांचं कॅन्सरमुळे निधन झाल्यानंतर त्यांनी क्योको यांच्याशी लग्न केलं.  

5/11

jaishankarkyokolovestory

एस. जयशंकर आणि क्योको यांची पहिली भेट 90 च्या दशकामध्ये झाली. त्यावेळी एस. जयशंकर हे भारतापासून 6000 किमी दूरवर असलेल्या जपानमधील भारतीय दुतावासामध्ये डेप्युटी चीफ ऑफ मिशन म्हणून काम करायचे. 1996 ते 2000 सालादरम्यान ते या पदावर जपानमध्ये राहूनच काम करत होते.

6/11

jaishankarkyokolovestory

एस. जयशंकर यांची पत्नी क्योको या अनेक कंपन्यांसाठी कंन्सल्टंट म्हणून काम करतात. दिल्ली विमानतळापासून ते हैदराबाद विमानतळापर्यंत अनेक व्यवस्थपकांसाठी त्या काम पाहतात.   

7/11

jaishankarkyokolovestory

एस. जयशंकर यांनी नुकत्यास सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात क्योको यांची दोन बँकखाती परदेशात असल्याचं सांगितलेलं. त्यापैकी एक खाता टोक्यो आणि दुसरं वॉशिंग्टनमध्ये आहे, असं नमूद होतं.  

8/11

jaishankarkyokolovestory

एस. जयशंकर यांना तीन मुलं आहेत. ध्रुव जयशंकर आणि अर्जुन जयशंकर ही दोन मुलं आणि मेघा नावाची मुलगी आहे. मेघा या अमेरिकेतील लॉस एन्जलिसमध्ये वास्तव्यास आहेत. त्या संगीत आणि मनोरंजन क्षेत्रात काम करतात. त्यांनी बीबीसीसाठीही काम केलं आहे.  

9/11

jaishankarkyokolovestory

जगातील सर्वात शक्तिशाली देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची पत्नी असूनही क्योको या अगदी साधेपणे राहतात. त्या फार क्वचितच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसतात. मात्र सरकारी प्रोटोकॉल पाळण्यासंदर्भात त्या फारच दक्ष असतात.  

10/11

jaishankarkyokolovestory

मागील वर्षी भारतात आयोजित केलेल्या जी-20 देशांच्या परिषदेमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या पत्नी क्योको यांनीच अनेक परदेशी प्रतिनिधींच्या पत्नींचं स्वागत केलं होतं.   

11/11

jaishankarkyokolovestory

एस. जयशंकर आणि त्यांची पत्नी क्योको या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 9 जानेवारी रोजी असतो. एस. जयशंकर यांना हिंदी, इंग्रजी, तमीळ, रशियन, हंगेरीयनसहीत एकूण अर्धा डझनहून अधिक भाषा बोलतात. क्योको सुद्धा अगदी छान हिंदी बोलतात.