Metro 4: मुंबई ते ठाणे प्रवास होणार सोपा, पहिल्या टप्प्यातील मुलुंड ते घोडबंदर मेट्रो संदर्भात मोठी अपडेट

Metro Mumbai to Thane: वडाळा-कासारवडवली-गायमुख दरम्यान मेट्रो-4 आणि मेट्रो 4-ए बांधण्यात येत आहेत. मेट्रो-4 चे बांधकाम 58 टक्के तर मेट्रो 4-अ चे काम 61 टक्के पूर्ण झाले आहे. 

Pravin Dabholkar | Oct 17, 2023, 11:11 AM IST

Metro Mumbai to Thane:या योजनेअंतर्गत स्टेशनवर स्टेनलेस स्टील बसवणे, प्लंबिंग, टाइल्स, पेंट, प्लास्टर, डेक रूफटॉप आणि इतर सुविधा विकसित करण्याचे काम केले जाणार आहे.

1/11

ठाणे ते मुंबई प्रवास होणार सोपा, मुलुंड ते घोडबंदर मेट्रो कधी सुरू होणार?

Metro Mumbai to Thane in two phases MMRD Update On Mulund and Ghodbunder Metro Line

Metro 4 : मुंबई आणि ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मेट्रो 4 मुळे हा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. ठाणे ते मुंबईला जोडणाऱ्या मेट्रो मार्गावर दोन टप्प्यात सेवा सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात घोडबंदर ते मुलुंड दरम्यान मेट्रो धावणार आहे. यासंदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने महत्वाचे अपडेट दिले आहे. 

2/11

2026-27 पर्यंत प्रतीक्षा

Metro Mumbai to Thane in two phases MMRD Update On Mulund and Ghodbunder Metro Line

2025 पर्यंत मेट्रो 4 कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यावर मेट्रो सेवा सुरु होईल, यासाठी काम सुरु असल्याचे एमएमआरडीएने सांगितले. असे असले तरी या मेट्रो मार्गावर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 2026-27 पर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. 

3/11

स्थानकाच्या उभारणीचे काम

Metro Mumbai to Thane in two phases MMRD Update On Mulund and Ghodbunder Metro Line

मुलुंड ते ठाण्यातील घोडबंदर रोड या मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. मेट्रो मार्गाबरोबरच स्थानकाच्या उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे. या मार्गावरील अनेक स्थानकांचे सिव्हिल काम 50 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. 

4/11

198 कोटी रुपये खर्च

Metro Mumbai to Thane in two phases MMRD Update On Mulund and Ghodbunder Metro Line

स्थानकाच्या सिव्हिल कामासोबतच पहिल्या टप्प्यातील सात स्थानकांच्या फिनिशिंगचे काम सुरू करण्याची तयारी आता एमएमआरडीएने सुरू केली आहे. याअंतर्गत मुलुंड फायर ते माजिवडा जंक्शन दरम्यान सात स्थानके बांधण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी सुमारे 198 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

5/11

कंत्राटदाराचा शोध

Metro Mumbai to Thane in two phases MMRD Update On Mulund and Ghodbunder Metro Line

या योजनेअंतर्गत स्टेशनवर स्टेनलेस स्टील बसवणे, प्लंबिंग, टाइल्स, पेंट, प्लास्टर, डेक रूफटॉप आणि इतर सुविधा विकसित करण्याचे काम केले जाणार आहे. फिनिशिंगचे काम सुरू करण्यासाठी एमएमआरडीएने कंत्राटदाराचा शोध सुरू केला आहे.

6/11

बजेट कुठे आणि किती खर्च होणार?

Metro Mumbai to Thane in two phases MMRD Update On Mulund and Ghodbunder Metro Line

मुलुंड अग्निशमन केंद्र, मुलुंड नाका, तीन हात नाका, आरटीओ ठाणे, महानगर पालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन आणि माडीवाडा स्टेशनच्या फिनिशिंग कामासाठी 198 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या मार्गावरील ट्रॅक टाकण्याच्या कामासाठी कंत्राटदाराची निवड प्रक्रियाही पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.

7/11

मेट्रो-4 मार्गाचे काम कुठपर्यंत?

Metro Mumbai to Thane in two phases MMRD Update On Mulund and Ghodbunder Metro Line

वडाळा-कासारवडवली-गायमुख दरम्यान मेट्रो-4 आणि मेट्रो 4-ए बांधण्यात येत आहेत. मेट्रो-4 चे बांधकाम 58 टक्के तर मेट्रो 4-अ चे काम 61 टक्के पूर्ण झाले आहे. 

8/11

कारशेडसाठी जागा

Metro Mumbai to Thane in two phases MMRD Update On Mulund and Ghodbunder Metro Line

मेट्रो-4 कॉरिडॉरसाठी कारशेड बांधण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. मेट्रो-4, मेट्रो-4-अ साठी मोघरपाडा येथे कारशेड तयार करण्यासाठी सुमारे 905 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

9/11

कंत्राटदाराचा निष्काळजीपणा

Metro Mumbai to Thane in two phases MMRD Update On Mulund and Ghodbunder Metro Line

कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे एलबीएस मार्गासह इतर ठिकाणी मेट्रोचे काम गेल्या वर्षीपर्यंत सुरू होऊ शकले नव्हते. यामुळे एमएमआरडीएने आता महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुख्य कंत्राटदाराच्या जागी उपकंत्राटदारांमार्फत रखडलेली कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

10/11

बांधकामाची कामे वेगाने

Metro Mumbai to Thane in two phases MMRD Update On Mulund and Ghodbunder Metro Line

प्रशासनाच्या या निर्णयानंतर गेल्या अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू असलेल्या मेट्रो 4 मार्गाच्या कामाला वेग आला आहे. बांधकामाची कामे वेगाने सुरू झाली आहेत. एलबीएस मार्गाच्या काही भागांवर तसेच इतर मार्गांवरही बरेच काम अपूर्ण आहे. 

11/11

काही भाग प्रवाशांसाठी खुला

Metro Mumbai to Thane in two phases MMRD Update On Mulund and Ghodbunder Metro Line

यापूर्वीच या मार्गाचे काम विविध कारणांमुळे विस्कळीत झाले आहे. आता निवडणुकीपूर्वी एमएमआरडीएला त्यातील काही भाग प्रवाशांसाठी खुला करायचा असल्याचे सांगितले जात आहे.