भारत-पाक मॅचदरम्यान मैदानात 5 वेळा झालाय तुफान राडा! पार हाणामारीवर उतरलेले खेळाडू

India VS Pakistan : क्रिकेटच्या मैदानावर जेव्हाही भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एकमेकांविरोधात खेळतात तेव्हा या सामन्याकडे जगाचं लक्ष असतं. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक विरोध संघ असल्याने दोन्ही संघाचे खेळाडू हा सामना जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावून खेळतात. हेच कारण आहे की या सामन्यादरम्यान मैदानावर खूप तणाव असतो. याचमुळे बऱ्याचदा या सामन्यादरम्यान मैदानात खेळाडूंमध्ये वाद झाल्याच्या घटना घडतात. भारत - पाकिस्तान सामन्यात झालेल्या 5 मोठ्या वादा बद्दल जाणून घेऊयात. 

Pooja Pawar | Feb 22, 2025, 14:56 PM IST
1/7

व्यंकटेश प्रसाद आणि आमिर सोहेलमध्ये झालेला वाद :

1996 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात आमिर सोहेलने व्यंकटेश प्रसादच्या बॉलवर चौकार मारत त्याला बॅट दाखवली आणि बाउंड्रीकडे इशारा केला. त्यानंतर पुढच्याच बॉलवर व्यंकटेश प्रसादने सुद्धा त्याला बाद केले. मग काय यानंतर व्यंकटेशने सुद्धा त्याला मैदानाच्या बाहेर जाण्याचा इशारा केला. या घटनेमुळे मैदानात दोघे आमने सामने आले आणि अंपायरला मध्यस्थी करावी लागली होती.

2/7

प्रेक्षकांवर चिडला होता इंजमाल उल हक :

भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान क्रिकेट सामन्यामध्ये एक सर्वात मोठा वाद इंजमाम उल हक सोबत घडला होता. 1997 जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये टोरंटो येथे सहारा फ्रेंडशिप कप खेळत होते तेव्हा काही प्रेक्षक सामन्यादरम्यान इंजमाम उल हकला वारंवार बटाटा म्हणून चिडवत होते. प्रेक्षकांकडून सतत चिडवण्यात येत असल्याने तो नाराज झाला आणि थेट बॅट  घेऊन प्रेक्षकांना मारण्यासाठी स्टॅन्डमध्ये घुसला. या दरम्यान मैदानातील ताण खूप वाढला होता. 

3/7

गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यातील बाचाबाची :

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज सलामीवीर फलंदाज आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी या दोघांमध्ये झालेल्या वादाची तर खूप चर्चा झाली होती. 2007 मध्ये एका वनडे सामन्यादरम्यान गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात खूप वाद झाला होता. या दोघांमध्ये झालेल्या वादामुळे मैदानातील वातावरण खूप तापलं होतं.

4/7

वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तरमध्ये झाला होता वाद :

टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने एकदा सांगितले होते की पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर लागोपाठ बाउंसर बॉल टाकून त्याला त्रास देत होता. यावेळी त्याने पाकिस्तानी गोलंदाजाला म्हंटले की नॉन स्ट्राईकवर एंडवर जो उभा आहे त्याला बाउंसर बॉल टाकून दाखव, तेव्हा नॉन स्ट्राईकवर एंडवर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर उभा होता. हे ऐकताच शोएब अख्तर आणि सेहवागमध्ये वाद सुरु झाला. 

5/7

ईशांत आणि अकमलमध्ये झाला राडा :

2012 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एका सामन्यादरम्यान भारतीय गोलंदाज इशांत शर्मा आणि पाकिस्तानचा माजी विकेटकिपर फलंदाज कामरान यांच्यात वाद झाला. यादरम्यान मैदानात दोघांनी एकमेकांनी शिवीगाळ केली. हा वाद मारामारी पर्यंत आला होता परंतु वेळीच सुरेश रैनाने मध्यस्थी केली आणि दोघांना वेगळं केलं. भारत पाकिस्तान सामन्यात झालेला हा वाद खूप गाजला होता. 

6/7

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत पाकिस्तान यांच्या हेड टू हेड सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला तर आतापर्यंत या स्पर्धेत दोन्ही संघ 5 वेळा आमने सामने आले आहेत. यापैकी तीन सामन्यांमध्ये पाकिस्तानने भारतावर विजय मिळवला तर दोनदा भारताला पाकिस्तानवर विजय मिळवण्यात यश आले.     

7/7

23 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा ग्रुप स्टेज सामना पार पडणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा यजमान असलेला पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून थेट बाहेर होईल. तसेच जर भारताला पाकिस्तानचा पराभव करण्यात यश आलं तर भारत थेट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये स्थान मिळवेल.