'छावा' नंतर आता सलमान खान बॉक्स ऑफिस गाजवणार, आगामी चित्रपटाबाबत मोठी अपडेट

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट सिकंदरचं नवीन पोस्टर प्रदर्शित झालं आहे. 

Soneshwar Patil | Feb 22, 2025, 13:44 PM IST
1/7

सलमान खान त्याच्या आगामी बहुप्रतिक्षीत चित्रपट 'सिकंदर'मुळे सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर 26 डिसेंबर 2024 रोजी लॉन्च करण्यात आले होते. 

2/7

अशातच आता सलमान खानच्या 'सिकंदर'चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. हे पोस्टर सलमान खानने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 

3/7

'सिकंदर' चित्रपटातील सलमान खानची पहिली झलक पाहून चाहते आता या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. नवीन पोस्टरमध्ये सलमान खान दमदार लुकमध्ये दिसत आहे. 

4/7

या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहेत. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. अशातच आता पोस्टर प्रदर्शित होताच ही उत्सुकता आणखी वाढली आहे. 

5/7

सलमान खानच्या चाहत्यांना 'सिकंदर' चित्रपटाबाबत एक खास सरप्राइज 27 फेब्रुवारीला मिळणार आहे.  चित्रपट निर्माते म्हणाले की, चाहत्यांचा प्रतिसाद हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 

6/7

'सिकंदर' चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच काजल अग्रवाल, सुनील शेट्टी, शर्मन जोशी हे देखील चित्रपटात दिसणार आहेत. 

7/7

सलमान खानच्या 'सिकंदर'चित्रपटाचे नवीन पोस्टरने चाहत्यांची चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढवली आहे. चाहत्यांना हा पोस्टर खूप आवडला आहे.