महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप 158 जागांवर तर शिवसेना, राष्ट्रवादीच्या वाट्याला 'इतक्या' जागा

Maharashtra Politics : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्य माहितीनुसार महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. तिनही पक्षांनी यावर संमती दिली आहे.   

| Oct 15, 2024, 14:49 PM IST
1/7

महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप 158 जागांवर तर शिवसेना, राष्ट्रवादीच्या वाट्याला 'इतक्या' जागा

2/7

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. यानुसार भाजप 158 जागांवर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

3/7

तर मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 70 जागा मिळण्याची शक्यता आहे. 

4/7

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 60 जागा येण्याची शक्यता आहे. 

5/7

महायुती मधील जो उमेदवार ज्या विधानसभा मतदारसंघातून (Assembly Election 2024) निवडुण येऊ शकतो, अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलं आहे. यामध्ये महायुतीमधील विद्यमान आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांचाही आढावा घेण्यात आला आहे.  

6/7

लोकसभेत जागावाटपावरून उशीर झाल्यानं महायुतीला चांगलाचं फटका बसला होता. त्यामुळे विधानसभेला खबरदारी म्हणून महायुतीचे उमेदवार लवकर जाहीर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

7/7

भाजपने 125 जागांचं मिशन ठेवलं असून . 'एक नेता, एक जिल्हा' धोरणाअंतर्गत प्रत्येक नेत्याला एका जिल्ह्याची जबाबदारी देणार आणि त्यानुसार निवडणूक रणनीती ठरवली जाणार आहे.