उद्यापासून भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली टेस्ट मॅच, फ्रीमध्ये कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
IND VS NZ Test Series : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार असून याचा पहिला सामना हा बुधवार 16 ऑक्टोबर पासून खेळवला जाणार आहे. बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर हा सामना रंगणार असून भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी ही टेस्ट सीरिज अत्यंत महत्वाची आहे.
1/5
काही दिवसांपूर्वीच बांगलादेश विरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिज मध्ये टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकून सिरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये आपले पहिले स्थान मजबूत केले. आता न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकून त्यांनाही क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असेल.
2/5
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला टेस्ट सामना हा बंगळुरू येथील स्टेडियमवर सकाळी 9: 30 वाजता सुरु होईल. त्यापूर्वी दोन्ही संघांमध्ये टॉस होईल.16 ते 20 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला टेस्ट सामना एम. चेन्नास्वामी स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान दुसरा टेस्ट सामना हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे होईल. तसेच तिसरा आणि शेवटचा टेस्ट सामना हा 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे खेळवला जाईल.
3/5
4/5
कुठे पाहता येणार सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या तीन टेस्ट सामन्यांची सीरिज प्रेक्षकांना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 चॅनलवर पाहता येतील. तर जिओ सिनेमावर या सामान्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. या टेस्ट सीरिजचे प्रसारण हक्क डीडी स्पोर्ट्सला मिळाले आहेत. फ्री डिश वापरकर्ते टीव्हीवर टेस्ट सामना फ्रीमध्ये पाहू शकतात.
5/5