PHOTO : लग्नापूर्वीच प्रेग्नेंट, 13 वर्षाच्या मुलाची आई; घटस्फोटानंतर 7 वर्ष लहान अभिनेत्याचा प्रेमात अभिनेत्री?

Entertainment : फोटोमध्ये दिसणारी चिमुकली आज एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक हिट चित्रपट दिले असून तिला दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. ही अभिनेत्री प्रोफेशनल लाइफसोबतच तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत असते. 

Dec 02, 2024, 23:31 PM IST
1/7

या अभिनेत्रीने अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपटांतून तिने आपला ठसा उमटवलाय. या अभिनेत्रीचा 3 डिसेंबरला वाढदिवस आहे. 1983 साली 'इंदिरा' या बंगाली चित्रपटातून या अभिनेत्रीने बालकलाकार म्हणून अभिनयाच्या जगात तिने प्रवेश केला. 

2/7

तुम्ही ओळखलं का अभिनेत्रीला? आम्ही सांगतो ही अभिनेत्री आहे कोंकणा सेन शर्मा. 2001 मधील 'मिस्टर अँड मिसेस अय्यर' या इंग्रजी चित्रपटातून तिने वाहवाह मिळवली. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 

3/7

2007 मध्ये 'ओंकारा' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये कोंकणा सेन शर्माने इंदूची भूमिका करून चर्चेत आली होती. या पात्रासाठी कोंकणाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

4/7

कोंकणा सेन शर्माची लव्ह लाईफही चर्चेत आहे. 2007 मध्ये तिने रणवीर शौरीला डेट करायला सुरुवात केली. 2010 मध्ये अभिनेत्री प्रेग्नंट असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. यानंतर कोंकणा आणि रणवीरने सप्टेंबर 2010 मध्ये लग्न केलं. मार्च 2011 मध्ये कोंकणा सेन शर्माने एका मुलाला जन्म दिला, त्याचं नाव हारून आहे. मात्र, दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही.

5/7

कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरी यांनी 10 वर्षे एकत्र राहिल्यानंतर 2020 मध्ये एकमेकांशी घटस्फोट घेतला. घटस्फोट घेण्यापूर्वीच दोघेही वेगळे राहू लागले होते. हा सिलसिला 5 वर्षे चालू राहिला.

6/7

अभिनेत्रीचा मुलगा आज 13 वर्षांचा आहे. काही काळापूर्वीच कोंकणा सेन सात वर्ष लहान अमोल पराशर रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी आली होती. मात्र त्यावेळी दोघांनीही याबाबत कोणतेही वक्तव्य केलं नाही. दोघांनीही डॉली किट्टी और वो चमकते सितारे या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

7/7

आपण लिंगभेदाकडे झुकत नसल्याचं अभिनेत्री म्हणते. शिवाय स्वत: Androgyny असल्याचंही म्हणते. ही एक अशी संज्ञा आहे ज्यामध्ये महिला आणि पुरुषांना विशेष हक्क आहेत. तर प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका अपर्णा सेन यांची कन्या कोंकणाची एकूण संपत्ती ही 5 दशलक्षच्या घरात आहे.