मेलबर्न टेस्टमध्ये का झाला टीम इंडियाचा पराभव? 'या' 5 गोष्टी ठरल्या कारणीभूत
IND VS AUS 4th Test : बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या टेस्ट सामन्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताला 340 धावांचं लक्ष दिलं होतं मात्र टीम इंडिया केवळ 155 धावा करून ऑल आउट झाली. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही सीरिज आता 1-2 अशा स्थितीत आहे. तेव्हा भारताच्या अपयशाची कारण कोणती याविषयी जाणून घेऊयात.
Pooja Pawar
| Dec 30, 2024, 17:55 PM IST
1/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/30/829269-ind-vs-aus-rtyh.jpg)
मेलबर्न टेस्टमध्ये भारतच्या पराभवाचा सर्वात मोठं कारण हे ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताने केलेली गोलंदाजी. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 474 धावा केल्या. स्टीव स्मिथने 140 धावा तर मार्नस लाबुशेनला 72 धावांची खेळी केली. सॅम कोंस्टसने 60 धावा केल्या, पहिल्या इनिंगमध्ये भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना लवकर बाद करण्यात यश आले नाही. पहिल्या इनिंगमध्ये मोहम्मद सिराजने 23 ओव्हर टाकून 122 धावा दिल्या होत्या.
2/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/30/829268-ind-vs-aus-dthg.jpg)
ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 474 धावांची आघाडी घेतली, मात्र टीम इंडिया फलंदाजीच्या पहिल्या इनिंगमध्ये 369 धावाच करू शकली. पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना रोहित शर्मा (3), केएल राहुल (24), विराट कोहली (36), ऋषभ पंत (28) यांनी खराब प्रदर्शन केले. ऑस्ट्रेलियाने पहिल्याच इनिंगमध्ये 105 धावांची कामगिरी केली. भारतासाठी पहिल्या इनिंगमध्ये फक्त नितीश रेड्डी (114) आणि यशस्वी जयस्वाल (82) यांनी धावा केल्या.
3/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/30/829267-shubhman-gill-dtgh.jpg)
मेलबर्न टेस्टमध्ये बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करणं हे टीम इंडियासाठी घातक ठरलं. शुभमन गिलला टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मधून ड्रॉप करण्यात आले. शुभमन गिलला प्लेईंग 11 मधून बाहेर करण्याचं कारण रोहित शर्माला ओपनिंगला पाठवणे. पण ओपनिंगला येऊन देखील रोहित शर्मा चांगला स्कोअर उभा करू शकला नाही. रोहित शर्मा पहिल्या इनिंगमध्ये 3 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 9 धावा बनवू शकला.
4/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/30/829266-ind-vs-aus-teh.jpg)
ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग सुरु असताना भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या चांगल्या विकेट मिळवल्या. बुमराहने 5, मोहम्मद सिराजने 3 तर रवींद्र जडेजाने 1 विकेट घेतल्या. मात्र नवव्या विकेटसाठी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी टीम इंडियाला खूप काळ वाट पाहायला लावली. दरम्यान फिल्डिंग करताना अनेक मोठे ब्लंडर झाले. यशस्वी जयस्वालने 3 कॅच सोडले. पहिल्या इनिंगच्या आधारे 105 धावांची आघाडी मिळवल्यानंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 91 धावांत 6 विकेट गमावल्या. त्यानंतर मार्नस लॅबुशेन 70 आणि कर्णधार पॅट कमिन्स 41 यांनी त्यानंतर नॅथन लिऑन नाबाद 41 आणि स्कॉट बोलँड नाबाद 10 केल्या. ऑस्ट्रेलियाने एकूण 339 धावांची आघाडी घेतली होती. मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी भारताला 340 धावांचे लक्ष्य मिळाले होते.
5/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/30/829265-yashavi-jaiswal-rth.jpg)
6/6
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/30/829264-rohit-sharma-rtyh.jpg)