मुकेश अंबानींच्या खेळीत फसले Airtel, Vi! आणला 50 रुपयांहून स्वस्त प्लान...

जिओने एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. ज्याची किंमत फक्त 49 रुपये आहे.

Pravin Dabholkar | Jan 13, 2025, 12:10 PM IST

Jio most Affordable Plan:जिओने एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. ज्याची किंमत फक्त 49 रुपये आहे.

1/9

मुकेश अंबानींच्या खेळीत फसले Airtel, Vi! आणला 50 रुपयांहून स्वस्त प्लान...

Jio Launches most Affordable Plan 49 competition with Airtel VI rupees Tech Marathi news

भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना नेहमीच काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असते. देशभरात त्यांचे 49 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. ग्राहकांना खूश ठेवण्यासाठी जिओ अनेकदा नवीन योजना आणि ऑफर घेऊन येत असते. 

2/9

जास्त इंटरनेट डेटा वापरणाऱ्यांसाठी

Jio Launches most Affordable Plan 49 competition with Airtel VI rupees Tech Marathi news

अलीकडेच जिओने काही प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. परंतु त्यांनी काही नवीन परवडणारे प्लॅन देखील लाँच केले आहेत. जे विशेषतः जास्त इंटरनेट डेटा वापरणाऱ्यांसाठी फायदेशीर आहेत. या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया. 

3/9

जिओचा अनलिमिटेड डेटा प्लॅन

Jio Launches most Affordable Plan 49 competition with Airtel VI rupees Tech Marathi news

जिओने एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. ज्याची किंमत फक्त 49 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमटेड डेटा मिळेल. जो खूप फायदेशीर आहे. तुमच्या रोजच्या डेटाची मर्यादा संपेल तेव्हा याचा उपयोग होईल. वेगवेगळ्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी याचा उपयोग होतो.

4/9

रोज 25 जीबी डेटा

Jio Launches most Affordable Plan 49 competition with Airtel VI rupees Tech Marathi news

  49 रुपयांचा प्लॅन हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यामध्ये अनलिमिटेड डेटा उपलब्ध आहे. परंतु त्यावर फेअर यूसेज पॉलिसी (FUP) लागू होते. तुम्ही 25 जीबीपर्यंत अमर्यादित डेटा वापरू शकता. ही योजना फक्त एका दिवसासाठी वैध असेल, हेदेखील लक्षात असू द्या. 

5/9

जिओच्या किमतींशी स्पर्धा

Jio Launches most Affordable Plan 49 competition with Airtel VI rupees Tech Marathi news

जर तुम्ही 25 जीबी डेटा वापरला तर तुमचा इंटरनेट स्पीड कमी होईल. जिओच्या या नवीन ऑफरमुळे एअरटेल, VI आणि BSNL सारख्या कंपन्यांवर दबाव वाढला आहे कारण त्यांना आता जिओच्या किमतींशी स्पर्धा करावी लागेल.

6/9

दोन वर्षांसाठी मोफत सबस्क्रिप्शन

Jio Launches most Affordable Plan 49 competition with Airtel VI rupees Tech Marathi news

  जिओने त्यांच्या जिओ फायबर आणि जिओ एअर फायबर ग्राहकांसाठी एक अतिशय छान ऑफर आणली आहे. त्यांच्या ग्राहकांना 2 वर्षांसाठी मोफत YouTube प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळतंय. ही ऑफर 11 जानेवारी 2025 पासून सुरू झाली आहे. 

7/9

यूट्यूब ओरीजनल कंटेंट

Jio Launches most Affordable Plan 49 competition with Airtel VI rupees Tech Marathi news

जर तुम्ही या सेवांचा लाभ घेत असाल तर तुम्ही कोणत्याही जाहिरातीशिवाय यूट्यूबवर व्हिडिओ पाहू शकता. कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता पुढच्या दोन वर्षांसाठी विशेष यूट्यूब ओरीजनल कंटेंटचा आनंद घेऊ शकता.

8/9

बॅकग्राउंडमध्ये व्हिडिओ

Jio Launches most Affordable Plan 49 competition with Airtel VI rupees Tech Marathi news

भारतात यूट्यूब प्रिमियमची किंमत 149 रुपये प्रति महिना इतकी आहे. यामध्ये तुम्ही व्हिडीओ डाउनलोड करू शकता. इतर काम करताना बॅकग्राउंडमध्ये व्हिडिओ पाहू शकता.

9/9

जाहिरातींशिवाय व्हिडिओ

Jio Launches most Affordable Plan 49 competition with Airtel VI rupees Tech Marathi news

एवढेच नव्हे तर या ऑफरसह जिओ आपल्या ग्राहकांना जाहिरातींशिवाय चांगला व्हिडिओ पाहण्याचा अनुभव देत आहे.