भारतीय स्वातंत्र्यदिन 2018 : भारतीय झेंडा फडकवताना 'या' गोष्टींचं भान ठेवा

Aug 14, 2018, 14:03 PM IST
1/10

सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स

सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स

आजकाल समाजातील प्रत्येक घटनांचा सोशल मीडियावरही पडसाद दिसून येतो. प्रोफाईल पिश्चर तिरंग्यामध्ये ठेवला जातो. सुप्रीम कोर्टाने तिरंग्यातील प्रोफाईल पिश्चरबाबत अजूनही कोणत्याही गाईडलाईन्स दिलेल्या नाही.   

2/10

प्लॅस्टिकबंदी

प्लॅस्टिकबंदी

स्वातंत्र्यदिनी विविध स्वरूपात झेंंडा फडकवला जातो. मात्र प्लॅस्टिकच्या झेंड्यावर बंदी आहे.

3/10

सुप्रीम कोर्टाचा आदेश

सुप्रीम कोर्टाचा आदेश

23 जानेवारी 2004 रोजी सुप्रिम कोर्टाने नागरिकांंना कारमध्ये झेंड्याची प्रतिकृती लावल्यास परवानगी दिली आहे. मात्र बोनोटवर झेंडा लावण्याची परवानगी केवळ काहीच लोकांना आहे. 

4/10

झेंडा झुकवण्याचा नियम

झेंडा झुकवण्याचा नियम

 केवळ राष्ट्रीयस्तरावर दु:खाच्या प्रसंगी तो अर्ध्यावर उतरवला जातो. 

5/10

पुरेसा प्रकाश

पुरेसा प्रकाश

सरकारी कार्यालयांवर सुट्टीच्या दिवशी, रविवारच्या दिवशीही सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत झेंडा फडकवला जातो. रात्री झेंडा फडकवला जातो मात्र त्या ठिकाणी पुरेसा प्रकाश असणं आवश्यक आहे. 

6/10

बिगुलचा आवाज

बिगुलचा आवाज

झेंडा नेहमी अभिमानाने फडकवला जातो आणि आदराने खाली उतरवला जातो. तिरंगा फडकवताना बिगुल वाजवले जाते. 

7/10

ध्वजारोहणाचे नियम

ध्वजारोहणाचे नियम

'फ्लॅग कोड ऑफ इंडिया`नुसार, भारतामध्ये प्रकाशात झेंडा फडकवला जातो. दिल्लीत कनॉट प्लेसमध्ये रात्रीही झेंंडा फडकवण्याला परवानगी दिली जाते.मात्र त्यावेळेस पुरेशी प्रकाशव्यवस्था केली जाते.               

8/10

ध्वजारोहणाचे नियम

ध्वजारोहणाचे नियम

झेंडा फाटलेल्या अवस्थेत, खराब झालेला असेल तर तो बदलला जाऊ शकतो. मात्र याकरितादेखील पुरेसा प्रकाश असणं आवश्यक आहे. हे कम सूर्यप्रकाशात केले जाते. 

9/10

कायदा काय सांगतो

कायदा काय सांगतो

अनेकदा राष्ट्रप्रेम दाखवताना लोक इमेज एडीटिंगच्या मदतीने तिरंग्यातील प्रोफाईल फोटो ठेवतात. पण कायद्याने हे योग्य आहे का? याचा विचार क्वचितच केला जातो. 

10/10

नियम

 नियम

भारताच्या स्वातंत्र्यदिनी झेंडा अभिमानाने फडकवला जातो. मात्र या उत्साहाच्या भरात काही चूका करणं महागात पडू शकते. म्हणूनच झेंड्याबाबत या गोष्टींची दक्षता नक्की बाळगा.