आई-बाबांच्या नावात दडलंय मुलांचं नाव, जाणून घ्या हटके नावाचं कॉम्बिनेशन
पालकांना मुलांची नावे ठेवणे हा मोठा यक्ष प्रश्न वाटतो. आपलं मुलांना जगातील सगळ्यात हटके आणि युनिक नाव द्यावं असं पालकांना वाटत असतं. अशावेळी पालकांच्या नावांच्या कॉम्बिनेशनवरुनच ठेवा मुलांची नावे.
घरी बाळ जन्माला आलं की, त्याच्या नावाची लगबग सुरु होते. प्रत्येक पालकांना आपल्या मुलाला युनिक आणि अनोखं असं नाव देण्यासाठी पालक उत्सुक असतात. पालक मुलांसाठी नाव शोधून काढण्यासाठी वेगळा शोध करतात. अशावेळी ही नावे नक्कीच मदत करतील.
मुलांची नावे ठेवताना वेगवेगळा ट्रेंड फॉलो केला जातो. यामधील एक ट्रेंड म्हणजे पालकांच्या नावांच्या कॉम्बिनेशनवर मुलांची युनिक नावे तयार करणे. या मुलांच्या नावांमध्ये पालकांच्या नावाचा अंश असतो. यामुळे ही नावे मुळातच युनिक ठरतात. चाईल्ड नेम स्पेशालिस्ट विशाल भारद्वाज यांनी आईवडिलांच्या नावाच्या कॉम्बिनेशनवरुन ही मुलांची नावे आणि त्याचे अर्थ सांगितले आहेत.
मुलांचे कॉम्बिनेशनमधील नाव 1
![मुलांचे कॉम्बिनेशनमधील नाव 1 Unique Baby Names With Combination on Parents](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/26/721694-twinsbaby.png)
मुलांचे कॉम्बिनेशनमधील नाव 2
![मुलांचे कॉम्बिनेशनमधील नाव 2 Unique Baby Names With Combination on Parents](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/26/721693-combinationbabynames3.png)
मुलांचे कॉम्बिनेशनमधील नाव 3
![मुलांचे कॉम्बिनेशनमधील नाव 3 Unique Baby Names With Combination on Parents](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/26/721692-combinationbabynames4.png)
आईचे नाव 'रिना' आणि बाबांचे नाव 'संजय' असेल मुलगा आणि मुलीसाठी दोन कॉम्बिनेशन नावे तयार होतात. अंजय - 'अंजय' हे मुलासाठी नाव निवडू शकता. या नावाचा अर्थ आहे कुणीही हरवू शकणार नाही असा. या नावाचा शुभांक जो अंकशास्त्रानुसार 6 असा आहे. अरिना - 'अरिना' हे मुलीसाठी नक्कीच निवडू शकता. या नावाचा अर्थ आहे देवाची भेटवस्तू. अंकशास्त्रानुसार या नावाचा शुभांक आहे 8.
मुलांचे कॉम्बिनेशनमधील नाव 4
![मुलांचे कॉम्बिनेशनमधील नाव 4 Unique Baby Names With Combination on Parents](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/26/721691-combinationbabynames5.png)
आईचे नाव 'शिल्पा' आणि बाबांचे नाव 'मोहित' असेल मुलगा आणि मुलीसाठी दोन कॉम्बिनेशन नावे तयार होतात. मोक्षिल - 'मोक्षिल' या नावाचा अर्थ आहे स्वर्ग. अतिशय युनिक असे हे नाव आहे. मोक्षिल या नावाचा शुभांक हा अंकशास्त्रानुसार 6 असा आहे. लोहिता- 'लोहिता' हे मुलीचे नाव देखील अतिशय युनिक आहे. या नावाचा अर्थ आहे लाल, सूर्यप्रकाश. लोहिता या नावाचा शुभांक हा 3 आहे.
मुलांचे कॉम्बिनेशनमधील नाव 5
![मुलांचे कॉम्बिनेशनमधील नाव 5 Unique Baby Names With Combination on Parents](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/26/721690-combinationbabynames6.png)
आईचे नाव 'वैष्णवी' आणि बाबांचे नाव 'मुरली' असेल मुलगा आणि मुलीसाठी दोन कॉम्बिनेशन नावे तयार होतात. रिश्नव - 'रिश्नव' हे अतिशय युनिक नाव आहे. हे नाव विष्णुचा नावावरुन घेण्यात आलं आहे. अंकशास्त्रानुसार रिश्नव या नावाचा शुभांक हा 1 आहे. माईशा - 'माईशा' या नावाचा अर्थ आहे ग्रेस. या नावाचा अर्थ आहे परमेश्वराची कृपा. अंकशास्त्रानुसार माईशा या नावाचा शुभांक हा 6 आहे.
मुलांचे कॉम्बिनेशनमधील नाव 6
![मुलांचे कॉम्बिनेशनमधील नाव 6 Unique Baby Names With Combination on Parents](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/26/721689-combinationbabynames2.png)
मुलांचे कॉम्बिनेशनमधील नाव 7
![मुलांचे कॉम्बिनेशनमधील नाव 7 Unique Baby Names With Combination on Parents](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/26/721688-combinationbabynames7.png)