पाणी न वापरताही लख्ख स्वच्छ करा खरकटी भांडी; या टिप्स ट्राय करुन बघाच

खरकटी भांडी साफ वेळेत साफ केली नाहीत तर त्याचा वेगळाच दर्प जाणवू लागतो. तसंच, बॅक्टेरियाचा संसर्गदेखील फैलावू शकतो. यावेळी जास्त पाणी व वापरताही भांडी घासण्याची एक वेगळी ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Mansi kshirsagar | Oct 12, 2023, 18:16 PM IST

How to wash dishes without water: खरकटी भांडी साफ वेळेत साफ केली नाहीत तर त्याचा वेगळाच दर्प जाणवू लागतो. तसंच, बॅक्टेरियाचा संसर्गदेखील फैलावू शकतो. यावेळी जास्त पाणी व वापरताही भांडी घासण्याची एक वेगळी ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

1/7

पाणी न वापरताही लख्ख स्वच्छ करा खरकटी भांडी; या टिप्स ट्राय करुन बघाच

How to wash dishes without water kitchen tips in marathi

How to wash dishes without water: जेवल्यानंतर भांडी घासणे हे महादिव्यच अशते. खरकटी भांडी लगेचच साफ केली नाहीतर चिकट डाग आणि भांड्याचा वास जाता जात नाही. कधीकधी पाणी नसेल किंवा कमी पाणी असेल तर भांडी घासणे कठिण होऊन जाते. अशावेळी पाणी न वापरताही भांडी कशी स्वच्छ करता येऊ शकतात हे जाणून घ्या. 

2/7

देवी लक्ष्मी नाराज होते

How to wash dishes without water kitchen tips in marathi

रात्रीची खरकटी भांडी तशीच ठेवल्यास देवी लक्ष्मी नाराज होते आणि घरात धन-धान्याची वृद्धी होत नाही, अशी मान्यता आहे. घरात खरकटी भांडी ठेवल्यास नकारात्मक उर्जा वाढते, असंही म्हटलं जाते. शास्त्रातदेखील याचा उल्लेख आढळतो. जेवल्यानंतर लगेचच खरकटी भांडी धुवून ठेवावी.   

3/7

राख

How to wash dishes without water kitchen tips in marathi

राखेचा वापर करुन तुम्ही खरकटी भांडी लख्ख साफ करु शकतात. राख भांड्यांना व्यवस्थित लावून घ्या जोपर्यंत भांडी स्वच्छ निघत नाहीत. त्यानंतर टिश्यू पेपरने भांडी स्वच्छ करुन घ्या. 

4/7

बेकिंग सोडा

How to wash dishes without water kitchen tips in marathi

भांडी करपली असतील किंवा जास्त चिकट झाली असतील तर कधी कधी साबण लावूनही त्यांचा चिकटपणा निघत नाही. अशावेळी बेकिंग सोड्याचा वापर तुम्ही करु शकता. सगळ्यात पहिले भांड्यावर थोडे गरम पाणी टाकून त्यावर बेकिंग सोडा ठेवून काहीकाळ असेच ठेवा. त्यानंतर स्पंजच्या मदतीने भांडी साफ करा. 

5/7

व्हिनेगर

How to wash dishes without water kitchen tips in marathi

पाण्याचा वापर न करता तुम्ही फक्त व्हिनेगरने भांडी स्वच्छ करु शकता. सगळ्यात पहिले टिश्यू पेपरने खरकटी भांडी स्वच्छ करा त्यानंतर व्हिनेगरचा स्प्रे भांड्यावर मारा आणि 10 ते 15 मिनिटे तसंच ठेवून द्या. त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा व्हिनेगरच्या मदतीने भांडी पुसून घ्या. व्हिनेगरने भांडी स्वच्छ तर होतील त्याचबरोबर दुर्गंधही नाहीसा होईल. 

6/7

लिंबू

How to wash dishes without water kitchen tips in marathi

सगळ्यात पहिले टिश्यू पेपरने खरकटी भांडी स्वच्छ करुन घ्या. त्यानंतर जितकी भांडी आहेत त्या हिशोबाने 2-3 चमचे बेकिंग सोडा घ्या आणि त्यात 2-3 लिंबांचा रस टाका. आता हे चांगले मिक्स करुन घ्या आणि स्पंजच्या मदतीने भांड्यांना लावून घ्या आणि काहीकाळ असेच ठेवल्यानंतर 5 मिनिटांनी टिश्यू पेपर किंवा कापडाच्या मदतीने स्वच्छ करुन घ्या. 

7/7

या टिप्स वापरा

How to wash dishes without water kitchen tips in marathi

या टिप्स वापरुन तुम्ही पाण्याचा वापर न करताही भांडी स्वच्छ करु शकता. ज्यांच्याकडे पाण्याची कमतरता आहे ते नक्कीच या टिप्स वापरु शकता.