मुकेश अंबानी कुटुंबासह बद्रीनाथ धामच्या दर्शनासाठी... तब्बल इतक्या कोटींचं केलं दान

Badrinath Dham : देशातील प्रसिद्ध उद्योगपत मुकेश अंबानी यांनी कुटुंबासह श्री बद्रीनाथ धामचं दर्शन घेतलं. यावेळी मुकेश अंबानी यांनी भगवान बद्रीनाथाची पूजा केली. मुकेश अंबाने यांच्या बद्रीनाथ दर्शनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

राजीव कासले | Oct 12, 2023, 16:14 PM IST
1/7

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या कुटुंबासह श्री बद्रीनाथ धामचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्याबरोबर सून राधिका मर्चंटही होती. 

2/7

अंबानी कुटुंबाने बद्रीनाथाचं दर्शन घेत अभिषेकही केला. बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी ही माहिती दिली

3/7

गुरूवारी चार्टर्ड प्लेनने अंबानी केदारनाथला पोहोचले. इथे त्यांचं फुलांची माळ घालून स्वागत करण्यात आलं.

4/7

अंबानी कुटुंबाने पूजा-अर्चा केल्यानंतर बद्रीनाथ केदारनाथ मंदिरासाठी तब्बल 5 कोटी रुपयांचं दान दिलं.

5/7

मुंकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांचं अनिल ध्यानी यांनी बद्रीनाथमध्ये स्वागत केलं. मुकेश अंबानी दरवर्षी बद्रीनाथ धामचं दर्शन घेतात.

6/7

पितृपक्षात बदरीनाथ-केदारनाथ धामचं दर्शन घेण्यासाठी अनेक वीवीआयपी येत आहेत. एकदिवस आधीच सुरेश रैना यांनी दर्शन घेतलं

7/7

त्याआधी मंगळवारी उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायम सिंह यादव यांचे छोटे पूत्र प्रतीक यादव यांनी बदरीनाथ धामचं दर्शन घेतलं होतं.