दुबईतील बीचवर मराठमोळ्या अभिनेत्रीचं साडीमध्ये फोटोशूट, अदा पाहून चाहते म्हणाले...

दुबईमध्ये समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीचं पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये जबरदस्त फोटोशूट. 

Soneshwar Patil | Feb 23, 2025, 15:48 PM IST
1/7

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी तिच्या सौंदर्य आणि हटके लुकने सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकतीच ती तिच्या नवीन लुकमुळे चर्चेत आलीय. 

2/7

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दुबईमधील समुद्रकिनारी फोटोशूट केलं आहे. नुकतेच तिने तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत. 

3/7

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. तिचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आलं आहे. 

4/7

समुद्रकिनारी अभिनेत्री मनमोकळ्या पणाने आनंद लुटताना दिसत आहे. तिच्या या पिवळ्या साडीवर गुलाबाच्या फुलांचं डिझाईन आहे. 

5/7

या साडीमध्ये सोनाली कुलकर्णी खूप सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने मस्त कॅप्शन देखील दिलं आहे. ज्यामध्ये तिने 'हवा के झोंके' असं कॅप्शन दिलं आहे.

6/7

तर या फोटोंना 'वो सर्दियों की धूप की तरह गुरूब हो गया लिपट रही है याद जिस्म से लिहाफ़ की तरह ….' असं कॅप्शन दिलं आहे. 

7/7

तर चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. साडीमधील सोनालीचं सौंदर्य पाहून चाहते देखील थक्क झालेत. तिचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.