PHOTO: AC कोचमध्ये मिळणारे ब्लँकेट्स किती दिवसांनी धुतले जातात? रेल्वेने दिलेलं उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसेल

Indian Railway Interesting Facts: भारतात रेल्वेचं जाळ खूप मोठं असून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी अनेक लोक रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या लोकांना उबदार ब्लँकेट्स, चादरी, उश्या दिल्या जातात. रेल्वे प्रवासानंतर प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या बेडशीट्स लगेचच धुण्यासाठी पाठवल्या जातात आणि स्वच्छ धुतलेल्या चादरी, बेडशीट्स नवीन येणाऱ्या प्रवाशांना दिल्या जातात. पण रेल्वेमध्ये मिळणाऱ्या ब्लँकेट्सबाबत तसं नसतं आणि हे ब्लँकेट्स तुम्हाला स्वच्छचं मिळतील असं नाही.     

| Oct 23, 2024, 12:13 PM IST
1/5

रेल्वेच्या एसी डब्यातून प्रवास करताना तुम्ही रेल्वे कडून देण्यात आलेलं ब्लँकेट्स अंगावर घेऊन झोपत असाल. पण तुम्हाला माहितीये का? रेल्वेकडून दिले जाणारे ब्लँकेट्स हे किती दिवसांच्या अंतराने धुतले जातात. एका आरटीआयमध्ये रेल्वेने दिलेल्या उत्तरानुसार रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना दिले जाणारे ब्लँकेट्स किती दिवसांनी धुतले जातात याविषयी सांगितले आहे.  

2/5

द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, आरटीआयमध्ये रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या उत्तरामध्ये म्हटले की, रेल्वे प्रवासादरम्यान दिले जाणाऱ्या लिनन चादरी आणि बेडशीट्स या प्रत्येकवेळी वापर झाल्यावर धुतल्या जातात. तर ब्लँकेट्स महिन्यातून कमीत कमी एकदा धुतल्या जातात. आम्ही हे ब्लँकेट्स महिन्यातून दोनदा धुण्याचा प्रयत्न करतो पण हे उपलब्धता आणि लॉजिस्टिक व्यवस्था यावर अवलंबून आहे.   

3/5

रिपोर्टमध्ये लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या हाउसकीपिंग स्टाफशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले कि ब्लँकेट्स हे महिन्यातून एकदा धुतले जातात. ब्लँकेट्स महिन्यातून दोन वेळा तेव्हाच धुतले जातात जेव्हा ब्लँकेट्सवर डाग पडतात किंवा त्यांचा कुबट वास येतो.   

4/5

भारतीय रेल्वे प्रवाशांकडून ब्लँकेट, चादरी आणि उशांच्या शुल्क आकारते जाते की नाही यावर रेल्वेने आरटीआयमध्ये उत्तर देताना सांगितले की, "हे सर्व रेल्वे भाडे पॅकेजचाच एक भाग असून याशिवाय गरीब रथ आणि दुरांतो सारख्या ट्रेनमध्ये तिकीट बुकिंग दरम्यान अतिरिक्त बेडरोल्स हवे असल्यास त्यासाठी अतिरिक्त रक्कम आकारली जाते. 

5/5

बूट लॉन्ड्री यामध्ये कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. विभागीय लाँड्री म्हणजे जमीन आणि वॉशिंग मशिन रेल्वेच्याच आहेत. मात्र, त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करता येते. बूट लाउंड्री म्हणजे बिल्ड ओन ऑपरेट ट्रान्सफर लॉन्ड्री हे रेल्वेच्या जमिनीवर स्थापन झालेलया असतात परंतु धुण्याचे उपकरण आणि कर्मचारी खाजगी कंत्राटदाराचे असतात.