घाणेरडा रुम, जेवण नाही! भारतीय अरबपतीची मुलगी युगांडाच्या तुरुंगात.. कोण आहे वसुंधरा ओसवाल?

Who is Vasundhara Oswal: भारतीय वंशाचे उद्योगपती पंकज ओसवाल यांची 26 वर्षांची मुलगी वसुंधरा ओसवाल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. वसुंधरा ओसवाल यांना युगांना पोलिसांनी अटक केली असून त्या युगांडातल्या तुरुंगात बंद आहेत. 

| Oct 22, 2024, 18:33 PM IST
1/7

घाणेरडा रुम, जेवण नाही! भारतीय अरबपतीची मुलगी युगांडाच्या तुरुंगात.. कोण आहे वसुंधरा ओसवाल?

2/7

भारतीय वंशाचे अरबपती पंकज ओसवाल यांची 26 वर्षांची मुलगी वसुंधरा ओसवाल हिला युगांडा पोलिसांनी अटक केली असून सध्या ती युगांडतल्या तुरुंगात आहे. मुलीच्या अटकेवर उद्योगपती पकंज ओसवाल यांनी युगांडाच्या राष्ट्रपतींना पत्रही लिहिलं आहे. तसंच संयुक्त राष्ट्राकडेही मुलीच्या सुटकेसाठी विनंती केली आहे. यानंतरही वसुंधार ओसवाल यांना तुरुंगात मुक्त करण्यात आलेलं नाही.

3/7

वसुंधरा ओसवाल बिझनेस टायकून पंकज ओसवाल आणि राधिक ओसवाल यांची मुलगी आहे. वडिलांच्या कंपनीत वसुंधरा अनेक जबाबदाऱ्या सांभाळतात. वसुंधरा पीआरओ इंडस्ट्रीजमध्ये संचालक पदावर काम करतात. कंपनीचा युगांडातील संपूर्ण कारभार वसुंधरा याच पाहातात. 1 ऑक्टोबरला वसुंधरा युगांडाच्या एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कहोल प्लांटच्या दौऱ्यावर होत्या. त्याचवेळी काही शस्त्रधारी लोकांनी तिला अटक केली.

4/7

या शस्त्रधारी लोकांकडे कोणतंही अटक वॉरंट नव्हतं. पंकज ओसवाल यांनी केलेल्या दाव्यानुसार वसुंधरा यांना अटक करणारी शस्त्रधारी हे स्वत:ला पोलीस अधिकारी सांगतायत. पण त्यांच्याकडे अटकेचं कोणतंही वॉरंट नव्हतं. किंवा त्यांच्याकडे पोलीस असल्याचं ओळखपत्रही नव्हतं. वसुंधरा यांना भेटण्याची कुटुंबियांना परवानगीही नाही.

5/7

वसुंधरा यांच्या अटकेनंतर त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युगांडाच्या तुरुंगात वसुंधरा यांना टॉर्चर केलं जात असल्याचा आरोप पंकज ओसवाल यांनी केला आहे. नव्वद तासाहून अधिक काळ वसुंधरा यांना चप्पल-बुटांनी भरलेल्या एका कोंदट खोली ठेवण्यात आलं आहे. या रुममध्ये त्यांना खाण्या-पिण्यासही दिलं जात नाहीए. तर बाथरुमची अवस्थाही अतिशय घाणेरडी आहे.   

6/7

आपल्या मुलीला खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचा दावा पंकज ओसवाल यांनी केला आहे. ओसवाल यांच्या युगांडातील घरातून एका कर्मचाऱ्याने किमती सामानाची चोरी केली होती. इतकंच नाही तर ओसवाल कुटुंबाच्या नावावर या कर्मचाऱ्याने 2,00,000 डॉलरचं कर्जही घेतलं होतं. हे प्रकार उघडकीस आल्यानंतर या कर्मचाऱ्याने वसुंधरा यांच्यावर खोटे आरोप केले. 

7/7

वसुंधरा यांचा जन्म 1999 मध्ये एका करोडोपती कुटुंबात झाला. ज्यांना वारशातच कोट्यवधीचा व्यवसाय मिळाला. पंकज ओसवाल यांचे भारतशिवाय ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड या देशातही व्यवसाय पसरला आहे. ओसवाल एग्रो मिल्सचे संस्थापक अभय कुमार ओसवाल पंकज ओसवाल यांनी पेट्रोकेमिकल, रिअल इस्टेटमध्ये आपला व्यवसायाचं जाळं विस्तारलं आहे.