एक पैसाही आयकर न घेणारे देश कोणते? Income Tax भरावा लागत नाही अशा देशांबद्दल जाणून घ्या

Budget 2025 Countries With Zero Income Tax: भारतात 30 टक्क्यांपर्यंत आयकर भरावा लागतो. असं असतानाच जगात असे देश आहेत जिथे एक पैशाचाही आयकर घेतला जात नाही. हे देश कोणते ते पाहूयात...

Swapnil Ghangale | Feb 01, 2025, 07:34 AM IST
1/10

zeroincometax

झिरो इन्कम टॅक्स नेशन्स म्हणजेच जिथे एक रुपयाही कर आकारला जात नाही असे देश जगात आहेत. ते देश कोणते हे पाहूयात...

2/10

zeroincometax

अर्थसंकल्प म्हटल्यानंतर सर्वसामान्यांना सर्वात आधी चिंता असते ती आयकर किती वाढणार अथवा कमी होणार याची. मात्र तुम्हाला माहितीये का जगात असे काही देश आहेत जिथे एका पैशाचाही आयकर घेतला जात नाही. विशेष म्हणजे केवळ वैयक्तिक आयकर नाही तर अनेक देशांमध्ये कंपन्यांकडूनही कर आकारला जात नाही. शून्य आयकर असलेले हे देश कोणते ते पाहूयात...

3/10

zeroincometax

वनुआटू - या ओशिएन नेशन्स म्हणजेच समुद्रातील छोट्या छोट्या देशांच्या प्रदेशातील देशामध्येही आयकर आकारला जात नाही. या देशातील कंपन्यांना 20 वर्षांची करसवलत दिली जाते. कंपन्यांकडून वर्षाला केवळ 300 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 26 हजार रुपये वार्षिक फी घेतली जाते.

4/10

zeroincometax

केमॅन बेटे - हा सुद्धा उत्तर अमेरिकेतली कॅरेबियन देशांपैकी एक बेटवजा देश आहे. या देशात आयकर आकारला जात नाही. येथे 7.5 टक्के स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. येथे गुंतवणूक करणाऱ्यांना नागरिकत्व देण्याचा कायदा अस्तित्वात नाही.  

5/10

zeroincometax

बॉर्म्युडा - या देशामध्येही आयकर आकारला जात नाही. येथे गुंतवणूक करणाऱ्यांना नागरिकत्व देण्याचा कायदा नाही. मात्र 2.5 मिलियन अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करुन येथे राहण्याची परवानगी मिळवता येते.  

6/10

zeroincometax

बहामा - कॅरेबियन बेटांवरील या देशामध्ये आयकर आकारला जात नाही. येथील कॉर्परेट टॅक्सचे दर अवघे 3 टक्के इतके आहेत. येथील संपत्तीवरील कर हा 0.75 ते 2 टक्क्यांदरम्यान आहे. 

7/10

zeroincometax

युएई : जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असलेल्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये वैयक्तिक आयकर आकारला जात नाही. तसेच कॅपिटल गेन्स, वारसा कर, भेटींवरील आणि संपत्तीवर कर आकारला जात नाही. येथील कॉर्परेट करही 375000 दिऱ्हाम्सपेक्षा (स्थानिक चलन) अधिक नफा कमवणाऱ्या कंपन्यांकडूनच आकारला जातो. कॉर्परेट कर 9 टक्के इतका आहे. जगातील सर्वात कमी कमी कॉर्परेट कर आकारणाऱ्या देशांमध्ये युएईचा समावेश होतो.  

8/10

zeroincometax

बहरिन : या देशात आयकर आकारला जात नाही. तसेच येथे केवळ गॅस आणि तेल कंपन्यांकडून 46 टक्के कॉर्परेट टॅक्स आकारला जातो. या देशातील व्हॅट 10 टक्के आहे. स्टॅम्प ड्युटीसाठीचा दर 1.7 ते 2 टक्के इतका आहे.

9/10

zeroincometax

सेंट किट्स आणि नेविस : या छोट्याश्या बेटवजा कॅरेबियन देशामधील आयकर, डिव्हिडंटवरील कर, रॉयलटी किंवा व्याजही भरावं लागत नाही. येथील कॉर्परेट कर 33 टक्के, व्हॅट 10 ते 15 टक्के आणि संपत्तीची मालकी असल्याचा कर 0.2 ते 0.3 टक्के आहे.  

10/10

zeroincometax

अँटिग्वा आणि बर्म्युडा : या देशामध्ये शून्य आयकर धोरण आहे. येथील व्यक्तींना आयकर, संपत्तीवरील कर, कॅपिटल गेन्स, वारसा कर असे कोणतेही कर भरावे लागत नाहीत. येथे नोंदणी करणाऱ्या कंपन्यांनाही पहिले 50 वर्ष कोणताही कर भरावा लागत नाही.