नवीन लग्न झालेल्या मुलीने फॉलो करा या टिप्स, पार्टनर नेहमी राहीलं खूष

 जर तुम्ही नवीन विवाहित असाल तर सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुमच्या जोडीदाराशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा. तुमच्या मनात जे आहे ते उघडपणे व्यक्त करा. त्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी आपोआप कमी होतील.

| Jan 01, 2024, 16:31 PM IST

Healthy Married Life Tips: जर तुम्ही नवीन विवाहित असाल तर सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुमच्या जोडीदाराशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा. तुमच्या मनात जे आहे ते उघडपणे व्यक्त करा. त्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी आपोआप कमी होतील.

1/9

नवीन लग्न झालेल्या मुलीने फॉलो करा या टिप्स, पार्टनर नेहमी राहीलं खूष

Healthy Married Life Tips For New Bride Marathi News

Healthy Married Life Tips: लग्न झाल्यावर सासरच्या मंडळींशी कसं जुळवून घेता येईल? हा प्रश्न प्रत्येक तरुणीच्या मनात असतो. आपण भावी पतीसोबत आनंदी जीवन जगू शकू का? घरातील लोक मला समजून घेतील का? असे प्रश्नही मुलींना सतावत असतात. 

2/9

काही महत्त्वाच्या टिप्स

Healthy Married Life Tips For New Bride Marathi News

त्यामुळे लग्नाआधी काही गोष्टींची अंमलबजावणी करणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात तुम्हाला सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेता येईल.पण प्रत्यक्षात हे कसे करता येईल? या संदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया. 

3/9

जास्त अपेक्षा ठेवू नका

Healthy Married Life Tips For New Bride Marathi News

नातेसंबंध म्हणजे एकमेकांकडून मोठ्या अपेक्षा असणे, असा अर्थ काढला जातो. पण तज्ज्ञांच्या मते, अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही. पण जास्त अपेक्षा ठेवणे जोडीदारांसाठी वाईट ठरु शकते. नवीन लग्न झाल्यानंतर दुसऱ्या जोडीदारावर जास्त अपेक्षांचे ओझे असू नये. 

4/9

मतभेद तणावात बदलतात

Healthy Married Life Tips For New Bride Marathi News

अपेक्षा जास्त ठेवल्याने अनेकदा जोडीदारांमध्ये मतभेद होतात. जे सुरुवातीच्या काळात कमी दिसतील. पण जसजसा वेळ जातो तसतसे मतभेद तणावात बदलतात.

5/9

स्पष्ट संवाद ठेवा

Healthy Married Life Tips For New Bride Marathi News

अनेक मुली त्यांच्या पार्टनरसोबत विचार स्पष्ट करत नाही, ही मोठी समस्या आहे. आपण काहीही न बोलता जोडीदाराने सर्वकाही समजून घ्यावे असे त्यांना वाटते. पण कोणाचेही शब्द काहीही न बोलता समजून घेणे सोपे नाही. त्यामुळे अशा अपेक्षा ठेवणे म्हणजे वैवाहिक जीवन बिघडवण्यासारखे आहे. 

6/9

अडचणी आपोआप कमी

Healthy Married Life Tips For New Bride Marathi News

जर तुम्ही नवीन विवाहित असाल तर सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुमच्या जोडीदाराशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा. तुमच्या मनात जे आहे ते उघडपणे व्यक्त करा. त्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी आपोआप कमी होतील.

7/9

समोरच्या व्यक्तीचे ऐका

Healthy Married Life Tips For New Bride Marathi News

एक जोडीदार दुसऱ्या जोडीदारावर खूप वरचढ ठरतो, अनेक वेळा असे घडते. एक जोडीदार त्याच्या मनात जे काही आहे ते दुसऱ्या जोडीदारासोबत शेअर करत असतो. पण दुसरा जोडीदार काही बोलूच शकत नाही. आपण असे असू नये. आपण बोलत असताना समोरच्याचे ऐकावे असे वाटते मग समोरच्याचेही पूर्ण बोलणे ऐकून घ्यायला हवे. असे केल्यास संभाव्य समस्या टाळल्या जातात.

8/9

समस्येचे निराकरण करा

Healthy Married Life Tips For New Bride Marathi News

जेव्हा तुम्ही दिवसाचे 24 तास एखाद्यासोबत राहता तेव्हा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर मतभेद होतातच. कधी कधी मतभेद हे परस्पर कलहाचे कारण बनतात. कधी कधी एखादी छोटी गोष्टही मोठ्या समस्येत बदलते. 

9/9

जीवन सुंदर होईल

Healthy Married Life Tips For New Bride Marathi News

तुमचे लग्न नवीन असो वा जुने. दोन्ही परिस्थितींमध्ये, हे महत्वाचे आहे की तुम्ही तुमची समस्या पूर्ण सोडवा. त्या अर्धवट सोडू नका. प्रश्न कोणताही असो, त्यावर चर्चा करून समस्येवर तोडगा काढा. अशा प्रकारे काहीही चुकीचे होणार नाही आणि नवीन विवाहित जीवन सुंदर होईल.