मराठी कुटुंबात जन्म, भारतीय क्रिकेट टीमची मजबूत भिंत, 52 वर्षांच्या क्रिकेटरची संपत्ती पाहून डोळे फिरतील
Rahul Dravid Networth : भारताचा दिग्गज क्रिकेटर आणि माजी कर्णधार राहुल द्रविड हा त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. राहुल द्रविडचा जन्म 11 जानेवारी 1973 मध्ये मराठी कुटुंबात झाला होता. क्रिकेटमध्ये उत्तमोत्तम कामगिरी करून द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत अनेक रेकॉर्डस् नावे केले. यासह निवृत्तीनंतर टीम इंडियाचा क्रिकेट प्रशिक्षक म्हणूनही त्याची कामगिरी वाखाडण्याजोगी होती. भारतीय संघाची मजबूत भिंत 'The Wall' म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड याच्या एकूण संपत्ती विषयी जाणून घेऊयात.
Pooja Pawar
| Jan 12, 2025, 12:32 PM IST
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/01/11/832938-rahul-dravid-dhj.jpg)
राहुल द्रविडचा जन्म हा इंदोर येथील मराठी ब्राम्हण कुटुंबात झाला. काही वर्षांनी त्याचं कुटुंब हे कर्नाटक येथील बंगलोरला स्थायिक झालं. राहुल टीम इंडियाकडून क्रिकेटरच्या तीनही फॉरमॅटमध्ये खेळला. सौरव गांगुली खराब फॉर्ममधून जात असताना जवळपास दोन वर्ष राहुलने भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व केलं. राहुलने 164 टेस्टमध्ये 13288 धावा, 344 वनडेमध्ये 10889 धावा, एका टी २०मध्ये 31 धावा केल्या.
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/01/11/832937-rahul-dravid-dh.jpg)
माजी क्रिकेटर राहुल द्रविडने 1996 मध्ये वनडे सामन्यात इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केले. द्रविडने टेस्ट क्रिकेटमध्ये 5 द्विशतक, 36 शतक आणि 63 अर्धशतक केली आहेत. तर वनडेत त्याने 12 शतक आणि 83 अर्धशतक केली आहेत. राहुल द्रविड आयपीएलमध्ये आरसीबी, आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग होता.
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/01/11/832936-rahul-dravid-world-cup-2024gjm.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/01/11/832935-rahul-dravid-yh.jpg)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/01/11/832934-rahul-dravid-sf.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/01/11/832933-rahul-dravid-gj.jpg)