'शिंदेंना महाराष्ट्राचं नेतृत्व करायला मिळालं याचा मला आनंद, अलीडकच्या 50...'; पवारांकडून कौतुकाचा वर्षाव
Sharad Pawar Praises Eknath Shinde: दिल्लीतील पुरस्कार सोहळ्यात केलेल्या जाहीर भाषणामध्ये शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात...
Swapnil Ghangale
| Feb 12, 2025, 08:47 AM IST
1/7
![eknathshindedelhiaward](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/12/843677-eknathshindedelhiaward6.jpg)
2/7
![eknathshindedelhiaward](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/12/843676-eknathshindedelhiaward5.jpg)
या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं तोंड भरुन कौतुक केलं. "मला आनंद आहे की, एकनाथ शिंदेंचा सत्कार याठिकाणी आहे. त्यांनी सांगितलं की, ते सातारचे आहेत. एकनाथराव, साताऱ्याने बरेच मुख्यमंत्री दिले. अनेकांना माहित नसेल मुंबई राज्याचा पहिला मुख्यमंत्री धनजीभाई कूपर. साताऱ्यात कूपर नावाची एक कंपनी होती. त्याचे मालक जे आता नाहीत ते मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते," असं शरद पवार म्हणाले.
3/7
![eknathshindedelhiaward](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/12/843675-eknathshindedelhiaward2.jpg)
4/7
![eknathshindedelhiaward](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/12/843673-eknathshindedelhiaward3.jpg)
5/7
![eknathshindedelhiaward](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/12/843672-eknathshindedelhiaward1.jpg)
"ठाणे, नवी मुंबई, मुंबई हा सगळा नागरी भाग आहे. अलीकडच्या 50 वर्षांमध्ये नागरी प्रश्नांसंबंधित जाण असलेला नेता कोण? याची जर माहिती घेतली तर कटाक्षाने एकनाथ शिंदे यांचं नाव घ्यावं लागेल. मग ते ठाणे असेल, ठाणे नगरपालिका असेल, नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील. म्हणून एक योग्य दिशा देण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं," असं शरद पवार म्हणाले.
6/7
![eknathshindedelhiaward](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/12/843671-eknathshindedelhiaward8.jpg)