चुकून हाती आलीय बनावट नोट तर तात्काळ करा हे काम, नाहीतर आयुष्यातील 7 वर्षे जातील जेलमध्ये!

नोट बनावट आहे हे माहीत असूनही ती वापरण्याचा प्रयत्न करणे यासाठी तुम्हाला 7 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

Pravin Dabholkar | Feb 11, 2025, 13:58 PM IST

Fake Currency Note Rules: नोट बनावट आहे हे माहीत असूनही ती वापरण्याचा प्रयत्न करणे यासाठी तुम्हाला 7 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

1/10

चुकून हाती आलीय बनावट नोट तर तात्काळ करा हे काम, नाहीतर आयुष्यातील 7 वर्षे जातील जेलमध्ये!

Fake Currency Note Rules in India possession punishment RBI guidelines

Fake Currency Note Rules: दिल्लीच्या एका न्यायालयाने 4 वर्षे जुन्या 2000 रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्या आणि वापरल्याच्या प्रकरणात 2 जणांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 489ब  म्हणजेच खऱ्या, बनावट किंवा बनावट चलनी नोटा किंवा बँक नोटा वापरणे आणि 489 क म्हणजेच बनावट किंवा बनावट चलनी नोटा बाळगणे अंतर्गत कारवाई केली आहे.

2/10

7 वर्षांचा तुरुंगवास

Fake Currency Note Rules in India possession punishment RBI guidelines

या लोकांकडून 2000 रुपयांच्या 29 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बनावट नोट छापणे किंवा प्रसारित करणे किंवा ती बनावट आहे हे माहीत असूनही ती वापरण्याचा प्रयत्न करणे यसाठी तुम्हाला 7 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. हा नियम सविस्तर जाणून घेऊया.

3/10

बनावट नोटांबाबत काय म्हणतो कायदा?

Fake Currency Note Rules in India possession punishment RBI guidelines

भारतात बनावट नोटा वापरणे, बनवणे, प्रसारित करणे किंवा बाळगणे यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. हा एक गंभीर गुन्हा आहे आणि भारतीय दंड संहिता (IPC), 1860 आणि इतर कायदेशीर तरतुदींनुसार दंडनीय आहे.

4/10

कलम 489अ

Fake Currency Note Rules in India possession punishment RBI guidelines

बनावट नोटा बनवणे किंवा त्या चनलात आणणे, यामुळे जन्मठेपेची शिक्षा किंवा 10 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंड होऊ शकतो.

5/10

कलम 489ब

Fake Currency Note Rules in India possession punishment RBI guidelines

अंतर्गत बनावट नोटा वापरणे किंवा प्रसारित करणे. यामुळे जन्मठेपेची शिक्षा किंवा 10 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंड होऊ शकतो.

6/10

कलम 489क

Fake Currency Note Rules in India possession punishment RBI guidelines

बनावट नोटा बाळगणे किंवा त्यांच्यासोबत पकडले जाणे. संबंधित व्यक्तीला त्या बनावट असल्याची माहिती होती, असे सिद्ध झाल्यास 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.

7/10

कलम 489ड

Fake Currency Note Rules in India possession punishment RBI guidelines

बनावट नोटा छापण्यासाठी उपकरणे किंवा प्लेट्स बनवणे किंवा जवळ ठेवणे. यामुळे जन्मठेपेची शिक्षा किंवा 10 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंड होऊ शकतो.

8/10

कलम 489ई

Fake Currency Note Rules in India possession punishment RBI guidelines

खऱ्या चलनी नोटांसारख्या जाहिराती, कागदपत्रे किंवा साहित्य छापणे. यामुळे 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतात.

9/10

इतर कायदे काय आहेत?

Fake Currency Note Rules in India possession punishment RBI guidelines

जर बनावट नोटा देशविरोधी कारवायांमध्ये वापरल्या जात असतील तर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत (UAPA, PMLA) देखील कारवाई केली जाऊ शकते. बनावट चलनाशी संबंधित प्रकरणांची चौकशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कायदा, 1934 अंतर्गत केली जाऊ शकते.

10/10

बनावट नोट मिळाल्यास काय करावे?

Fake Currency Note Rules in India possession punishment RBI guidelines

जर तुम्हालाही बनावट नोट मिळाली तर ताबडतोब जवळच्या बँकेला किंवा पोलिसांना कळवा. इतर कोणालाही बनावट नोटा देणे किंवा वापरणे टाळा, कारण हा देखील गुन्हा आहे. बँक बनावट नोट जप्त करेल आणि त्याबद्दल पोलिस आणि आरबीआयला माहिती देईल.