ओठांची सर्जरी, साधना कट! अभिनेत्रीचा लूक इतका बदलला... चाहते हैराण

What happened with Ayesha Takia : 2004 मध्ये एक चित्रपट आला होता, या चित्रपटाचं नाव होतं 'टारझन द वंडर कार'. हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय झाला. याबरोबरच या चित्रपटात काम करणारी अभिनेत्रीही चांगलीच चर्चा रंगली.

| Aug 22, 2024, 19:42 PM IST

What happened with Ayesha Takia : 2004 मध्ये एक चित्रपट आला होता, या चित्रपटाचं नाव होतं 'टारझन द वंडर कार'. हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय झाला. याबरोबरच या चित्रपटात काम करणारी अभिनेत्रीही चांगलीच चर्चा रंगली.

1/8

ओठांची सर्जरी, साधना कट! अभिनेत्रीचा लूक इतका बदलला... चाहते हैराण

2/8

बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकियाने आपले नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत. ही आयेशा टाकियाच आहे, यावर चाहत्यांचा विश्वास बसत नाहीए. आयेशाच्या फोटोंवर युजर्स अनेक कमेंट्स करत आहेत. 

3/8

आयेशा टाकियाचा बदललेा लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. गेल्या वीस वर्षातला तिचा ट्रान्सफॉर्मेंशन पाहून चाहते आश्चर्य व्यक्त करतायत. वॉन्टेड गर्लच्या नव्या लूकवर चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

4/8

10 एप्रिल 1986 मध्ये आयेशा टाकियाचा जन्म झाला. 2004 मध्ये तीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा पहिला टारझन द वंडर कार चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला. त्यानंतर सलमान खानबरोबरच वॉन्टेड, कॅश, दिल मांगे मोर, शादि नंबर 1, पाठशाला अशा अनेक चित्रपटात काम केलं.  

5/8

नुकताच कांजीवरम साडीत आयेशा टाकियाने व्हिडिओ शेअर केला. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. पण काही युजर्सना तिचा हा लूक फारसा आवडलेला नाही. ओठांची सर्जरी केल्यामुळे लूक बदलल्याचं युजर्स म्हणतायत.

6/8

आयेशा टाकिया याआधीही सर्जरीमुळे चर्चेत होती. तीने लिप्स, आयब्रो, हनुवटी आणि कपाळाची शस्त्रक्रिया केल्याचा दावा केला जात आहे. पण यावर आयेशाने स्वत कधीही प्रतिक्रिया दिली नाही. इतकंच काय तर तीने ब्रेस्टची सर्जरी केल्याचंही बोललं जातंय.

7/8

आयेशा टाकियाचा जन्म मुंबईत झाला. तिचे वडिल गुजराती तर आई अँग्लो इंडियन आहे. आयेशाचे वडिल हे उद्योगपती असून त्यांचं हॉटेल चेन आहे. आयेशाला एक बहिण असून तिचं नाव नताशा आहे. 

8/8

आयेशा टाकियाने 23 वर्षांची असताना बॉयफ्रेंड फरहान आझमीशी लग्न केलं. फरहान हा समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा आहे. 1 मार्च 2009 मध्ये दोघांनी लग्न केलं.