Dragon Fruit चे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? कोलेस्ट्रॉलच नाही तर 'या' 6 समस्यांना ठेवतं दूर

Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूट हे फळ आपण खाल्लं नसेल पण नक्कीच नाव ऐकूण असू. ड्रॅगन फ्रुटला पताया आणि कमलम या नावानं देखील ओळकतात. अनेक लोक आहेत, ज्यांना ड्रॅगन फ्रुटची चव आवडत नाही. पण ड्रॅगन फ्रुटची चव ही कीवी सारखी असते. ड्रॅगन फ्रुट खाण्याचे अनेक फायदे आहेत. ड्रॅगन फ्रुटमध्ये सगळ्यात जास्त व्हिटामीन सी, कॅरोटीन, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, फॉस्फर सारखे अनेक गुणधर्म आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. ड्रॅगन फ्रुट खाल्यानं कोलेस्ट्रॉल देखील कमी होतो. चला तर जाणून घेऊया ड्रॅगन फ्रुट खाण्याचे फायदे...  

Diksha Patil | Apr 24, 2023, 19:06 PM IST
1/7

कोलेस्ट्रॉल होईल कमी

dragon fruit benefits

बॅड कोलेस्टेरॉलमुळे हृदयासंबंधीत समस्या होतात. जर तुम्हाला हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तुम्हाला कोलेस्ट्रॉल नियंत्रीत असणं गरजेचं आहे. ड्रॅगन फ्रुटमध्ये असलेलं पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट, ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी अॅसिड, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. त्यामुळे रोजच्या जीवनात ड्रॅगन फ्रुटचे सेवन करण्यास सुरुवात करा. 

2/7

ब्लड शूगर कंट्रोल

dragon fruit benefits

ड्रॅगन फ्रूटमध्ये अनेक पोषक तत्व असतात ज्यामुळे ब्लड शुगर म्हणजेच रक्तातील साखरेवर नियंत्रण येते. ज्या लोकांना डायबिटीज आहे त्यांनी शुगर कंट्रोल करण्यासाठी ड्रॅगन फ्रुटचे सेवन केले पाहिजे. 

3/7

रोगप्रतिकारशक्ती वाढते

dragon fruit benefits

ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि छोट्या मोठ्या आजारांपासून तुमचे संरक्षण होऊ शकते. ड्रॅगन फ्रुट खाल्यानं रोगप्रतिकार शक्ती वाढते. 

4/7

पचनक्रिया सुधारते

dragon fruit benefits

ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने पचनाशी संबंधित आजारांपासून सुटका मिळते.  ड्रॅगन फ्रुटमध्ये फायबरचे प्रमाण खूप असते त्यामुळे पचनक्रिया सुधारते. तर पाण्याचेही त्यात प्रमाण जास्त आहे. 

5/7

हृदयविकार होण्याची शक्यता होईल कमी

dragon fruit benefits

आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य नरेश जिंदाल यांच्या मते ड्रॅगन फ्रूटच्या सेवनाने हृदयविकारांपासून बचाव होतो. यात असलेल्या काळ्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे हृदय निरोगी राहते.

6/7

अशक्तपणा असेल तर करा ड्रॅगन फ्रुटचं सेवन

dragon fruit benefits

ड्रॅगन फ्रुटमध्ये आयरन मोठ्या प्रमाणात असते. ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते. त्यामुळे ड्रॅगन फ्रूट खाल्यानं अशक्तपणा दूर होतो. 

7/7

हाडं होतात मजबूत

dragon fruit benefits

ड्रॅगन फ्रूट खाल्यानं हाडे आणि दात मजबूत होतात. यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. (All Photo Credit : File Photo) (Disclaimer : दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)