ऑन स्क्रीन असो की ऑफ स्क्रीन, 'या' अभिनेत्यासोबत प्रत्येक अभिनेत्रीला करायचा होता रोमान्स, पण अभिनेता...

असा एक आकर्षक अभिनेता होता ज्याच्यासोबत प्रत्येक अभिनेत्रीला करायचा होता रोमान्स. पण अभिनेत्याला या अभिनेत्रीची खूप भीती वाटायची. 

Soneshwar Patil | Jan 24, 2025, 12:47 PM IST
1/7

रोमान्स

ऑन-स्क्रीन असो की ऑफ-स्क्रीन इंडस्ट्रीतील प्रत्येक अभिनेत्रीला राजेश खन्नासोबत रोमान्स करायचा होता. पण एक अभिनेत्री अशी होती जिला पाहून अभिनेता खूप घाबरायचा. 

2/7

राजेश खन्ना

70 च्या दशकातील अभिनेता राजेश खन्ना आज आपल्यामध्ये नसतील पण ते त्यांच्या शानदार चित्रपटांसाठी नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मुली त्यांना रक्ताने पत्र लिहित असत. 

3/7

ब्लॉकबस्टर

1969 ते 1971 या काळात राजेश खन्ना यांनी सलग 17 ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आणि सिनेजगतातील ते एक मोठे सुपरस्टार बनले. प्रत्येक मुलगी त्यांच्यावर प्रेम करत होती. 

4/7

हिट चित्रपट

मात्र, राजेश खन्ना आशा पारेख यांना घाबरायचे. 60 आणि 70 च्या दशकात आशा पारेख यांनी इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले. राजेश खन्ना मला घाबरतात हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. 

5/7

बहारों के सपने

दोघांनी 'बहारों के सपने' या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. तेव्हा राजेश खन्ना हे आशा यांना घाबरत होते. कारण त्यावेळी त्यांनी नुकतीच कारकीर्द सुरु केली होती. 

6/7

तोंड फिरवायचे

आशा पारेख यांना पाहून राजेश खन्ना हे तोंड फिरवायचे. हे पाहून आशा यांना खूप वाईट वाटायचे. त्यावेळी राजेश खन्ना यांनी आशा यांना फोन करून सांगितले होते. 

7/7

एकत्र काम

त्यानंतर राजेश खन्ना हळूहळू सुपरस्टार बनले. त्यावेळी त्यांच्यासोबत काम करणे आशा यांना जरा कठीण चात होते. मात्र, त्यानंतर त्यांनी एकत्र अनेक चित्रपट केले.