'छावा' पाहायला जाण्याआधी लक्ष्मण उतेकरांचे 'हे' चित्रपट पाहाच

बऱ्याच दिवसांपासून 'छावा' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. त्यात चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शिता झाला. ट्रेलरमध्ये संभाजी महाराजांना डान्स करताना दाखवल्यानं प्रेक्षकांमध्ये वाद सुरु झाला आहे. अनेकांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना सवाल केले आहेत.

Diksha Patil | Jan 24, 2025, 12:52 PM IST
1/7

असं असलं तरी देखील त्या आधी त्यांनी दिग्दर्शित केलेले कोणते चित्रपट आहेत. ज्यांची सगळ्यांनी स्तुती केली आहे त्यामुळे त्यांच्या आधीचे कोणते चित्रपट आहेत त्यावर एक नजर टाकूया...

2/7

टपाल

2014 मध्ये प्रदर्शित झालेला 'टपाल' या चित्रपटाची गोष्ट हटके आहे. कशा प्रकारे एक मुलगा त्याच्या बालपणीच्या गर्लफ्रेंडला पत्र लिहितो आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की हे चुकीच्या व्यक्तीच्या हाती देखील लागू शकतं. तर हा चित्रपट तुम्ही Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 

3/7

लालबागची राणी

एक विशेष गरजा असलेली मुलगी ही मुंबईत कशी हरवते. त्यानंतर कशा प्रकारे तिला या संपूर्ण प्रवासात भेटणाऱ्या लोकांच्या आयुष्यात कसे बदल घडवते. दरम्यान, हा चित्रपट तुम्ही युट्यूबवर पाहू शकता. 

4/7

लुका छुपी

एक रिपोरट कशाप्रकारे त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकारीच्या प्रेमात पडतो आणि विवाहीत असल्याचं खोटं सांगून ते लिव्ह-इनमध्ये राहतात. त्यानंतर कसा सगळा गोंधळ होतो त्याची एक गंमतशीर गोष्ट आहे. तर हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 

5/7

मिमी

2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सरोगसीविषयी सांगण्यात आलं आहे. या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. 

6/7

जरा हटके जरा बचके

विवाहीत जोडप्याला जेव्हा जॉइंच फॅमिलीमध्ये राहायचा कंटाळ येतो आणि ते न्युक्लिअर फॅमिलीमध्ये राहण्याचा विचार करतात. त्यात सरकारच्या स्किममधून त्यांना स्वत: चं हक्काच घर मिळावं म्हणून ते घटस्फोट घेत असल्याचं खोटं नाटक कसं करतात त्याविषयी दाखवलं आहे. तर हा चित्रपट तुम्ही जियो या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 

7/7

छावा

दरम्यान, लक्ष्मण उतेकर यांच्या 'छावा' या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतीक्षा करत असताना दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराजांना डान्स करताना पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी तुम्ही थिएटरमध्ये पाहू शकता.