सचिन तेंडुलकर याचे 'ते' 7 टॉप सिक्रेट तुम्हाला माहितीये का?

7 Unknown facts about Sachin Tendulkar: काही दिवसांपूर्वी सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याने ट्विटरवर #asksachin अशी मोहीम राबावली होती. त्यावेळी सचिनने थेट चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यावेळी त्याने अनेक खुलासे देखील केले आहेत. सचिनबद्दल अनेक मनोरंजक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर सचिनने आपल्या नावाप्रमाणे भारदस्त उत्तर दिली.

Apr 24, 2023, 19:33 PM IST

Sachin Tendulkar 50th birthday: काही दिवसांपूर्वी सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याने ट्विटरवर #asksachin अशी मोहीम राबावली होती. त्यावेळी सचिनने थेट चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यावेळी त्याने अनेक खुलासे देखील केले आहेत. सचिनबद्दल अनेक मनोरंजक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर सचिनने आपल्या नावाप्रमाणे भारदस्त उत्तर दिली.

1/7

आवडतं स्टेडियम कोणतं? सचिनला आवडतं स्टेडियम कोणतं असा प्रश्न विचारला गेला, त्यावर त्याने वानखेडे आणि चेपॉक या दोन स्टेडियमची नावं घेतली. 

2/7

पर्थमध्ये ब्रेट लीला अपर कट सचिनला त्याचा सर्वात उत्तम शॉर्ट बद्दल विचारण्यात आला, त्यावर सचिनने सर्वांना आश्चर्यात टाकणारं उत्तर दिलं. पर्थमध्ये ब्रेट लीच्या गोलंदाजीवर मारलेला अपर कट मला सर्वात जास्त आवडला, असं सचिन म्हणतो.

3/7

सचिनचा फेवरेट फुटबॉलर सचिनचा फेवरेट फुटबॉलर कोणता असा सवाल एका नेटकऱ्याने विचारला त्यावर सचिनने मेस्सीचा फोटो शेअर केला.

4/7

सुनील गावस्कर बरोबर तुम्ही ओपनिंग करत आहात आणि समोर वेस्ट इंडिजसारखा आक्रमक संघ आहे तर स्ट्राइक कोणी घेतली असती? त्यावर सचिनने उत्तर दिलं, सुनील गावस्कर...

5/7

तुमचा सर्वात आवडता पदार्थ कोणता ? असा प्रश्न सचिनला विचारण्यात आला होता. त्यावर त्याने स्ट्रेट ड्राईव्ह मारत बिर्यानीचं नाव घेतलं.

6/7

कव्हर ड्राइव्ह की स्ट्रेट ड्राइव्ह? फलंदाजी करताना कोणता फटका तुम्हाला अधिक आत्मविश्वास देतो? जेव्हा मी स्ट्रेट ड्राईव्ह मारतो तेव्हा मला कळते की माझे शरीर संतुलन योग्य आहे आणि तो माझा आवडता शॉट देखील आहे.

7/7

वर्ल्ड कप फायनलमध्य तू बाद झाला, विराट मैदानात आला, तेव्हा त्याला काय सांगितलं? आताही चेंडू थोडा स्विंग होत आहे, असं मी त्याला सांगितलं होतं, असं सचिन म्हणतो.