चहा-कॉफी नव्हे, 'या' आरोग्यवर्धक पेयांनी करा दिवसाची सुरुवात; आजारपण राहील दूर

7 Morning Drinks To Improve Your Digestive Health : तुम्हीही दिवसाची सुरुवात चहा- कॉफीनं करताय? जाणून घ्या त्याऐवजी कोणती पेय ठरतील फायद्याची...   

Jan 27, 2025, 15:02 PM IST

7 Morning Drinks To Improve Your Digestive Health : दिवसाची सुरुवात करण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. पण, अनेकदा ही सवय शरीरासाठी फायद्याची ठरत नाही. 

1/7

लिंबाचं पाणी

did you know 7 Morning Drinks To Improve Your Digestive Health

दिवसाची सुरुवात करण्यासाठी गरम पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्यास पचनक्रिया सुरळीत चालते. या सवयीमुळं शरीरातील हानिकारक घटकांचं उत्सर्जन होण्यास मदत होते.     

2/7

आल्याचं पाणी

did you know 7 Morning Drinks To Improve Your Digestive Health

आल्यामध्ये असणाऱ्या गुणांमुळं पोट फुगणं, मळमळ या आणि अशा समस्या दूर ठेवण्यास मदत होते. सकाळी गरम पाण्यात आलं मिसळून पिण्याचे अनेक फायदे होतात.   

3/7

पेपरमिंट

did you know 7 Morning Drinks To Improve Your Digestive Health

पेपरमिंट किंवा पुदिन्यामध्ये असणाऱ्या गुणांनी स्नायूंना बळकटी मिळते. अपचनावर उपाय म्हणून गरम पाण्याच पुदिना मिसळून प्यावं.   

4/7

अॅपल सायडर व्हिनेगर

did you know 7 Morning Drinks To Improve Your Digestive Health

पचनक्रिया सुधारण्यासाठी गरम पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून प्यायल्यास अॅसिडीटी कमी होते.   

5/7

कोरफड

did you know 7 Morning Drinks To Improve Your Digestive Health

पाण्यातून कोरफडीचा गर प्यायल्यास त्यामुळं आतड्यांमधील हानिकारक घटक शरीराबाहेर पडण्यास मदत होते.   

6/7

हळदीचं दूध

did you know 7 Morning Drinks To Improve Your Digestive Health

हळदीमध्ये असणारे रोगप्रतिकारक गुणधर्म शरीरास फायदेशीर ठरतात. त्यामुळं हळद मिसळलेलं दूध पिणं फायदेशीर ठरतं.   

7/7

प्रोबायोटीक योगर्ट

did you know 7 Morning Drinks To Improve Your Digestive Health

पोटाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रोबायोटिक बॅक्टेरिया बरीच मदत करतात. त्यामुळं प्रोबायोटीक योगर्ट पिण्याचा सल्ला दिला जातो. (वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)