अफगाणिस्तानच्या खेळाडूंचा पगार किती? भारताच्या C ग्रेडमधल्या खेळाडूंचीही कमाई जास्त

India And Afghanistan Cricketers Salary : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. पहिल्यांदाच या दोन संघांदरम्यान द्विपक्षीय मालिका खेळवली जाणार आहे. या निमित्ताने दोनही संघांच्या खेळा़डूंची कमाई किती याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 

| Jan 11, 2024, 16:29 PM IST
1/7

अफगाणिस्ताचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. यानिमित्ताने दोनही संघांच्या खेळाडूंची कमाई किती याची उत्सुकता चाहत्यांना आहे. 

2/7

भारत आणि अफगाणिस्तान संघाच्या क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या कमाईत जमीनआसमानाचा फरक आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंना दरमहा पगार दिला जातो. 

3/7

एका रिपोर्टनुसार अफगाणिस्तान क्रिकेट संघातील टॉपच्या खेळाडूला महिन्याला साधारण 58 हजार रुपये पगार मिळतो. म्हणजे त्याची वार्षिक कमाई जवळपास 6 लाख रुपये इतकी आहे. 

4/7

अफगाणिस्तानमधल्या युवा खेळाडूंना तर या पेक्षाही कमी पगार आहे. युवा खेळाडूंना महिन्याला 32 ते 48 हजार पगार मिळतोय. म्हणजे युवा खेळाडूंची वार्षिक कमाई 4 ते 5 लाख रुपये आहे. 

5/7

याऊलट भारतीय क्रिकेटपटू करोडोत कमावतात. आंतरराष्ट्रीय सामन्यांशिवाय आयपीएलमधूनही भारतीय खेळाडूंना करोडो रुपयांची कमाई होते.

6/7

भारतीय क्रिकेट बोर्डने खेळाडूंची A+ , A, B आणि C अशा चार कॅटेगिरीत विभागणी केली आहे. या कॅटेगिरीनुसार खेळा़डूंना पगार दिला जातो.

7/7

A+ ग्रेडमधल्या खेळाडूंना वर्षाला 7 कोटी, A ग्रेड खेळाडूंना वर्षाला 5 कोटी, तर B ग्रेड खेळाडूंना वार्षिक 3 कोटी रुपये मिळतात. C ग्रेड खेळाडूंना 1 कोटी रुपये दिले जातात.