PHOTO : नागा चैतन्य-शोभिताचं अखेर विवाहबंधनात! वधू वराचे पहिले फोटो समोर

Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Wedding : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला आज विवाहबंधनात अडकले. हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये पारंपारिक पद्धतीने त्यांचा विवाह झाला. 

नेहा चौधरी | Dec 04, 2024, 23:40 PM IST
1/8

ज्या क्षणाची चाहते अनेक महिन्यांपासून वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला अखेर लग्नबंधनात अडकले.

2/8

चैतन्य आणि सोभिता यांच्या लग्नसोहळ्यासाठी तेलुगू इंडस्ट्रीमधली अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. चिरंजीवी, पवन कल्याण, अल्लू अर्जुन, राणा दग्गुबती, राम चरण आणि त्याची पत्नी उपासना, महेश बाबू आणि त्याची पत्नी अभिनेत्री नम्रता शिरोडकर आले होते. 

3/8

8 ऑगस्ट रोजी नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा झाला होता. अभिनेत्याचे वडील नागार्जुन यांनी साखरपुड्याचे पहिले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर चाहते त्यांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत होते. 

4/8

चैतन्य आणि शोभिता यांनी चाहत्यांना त्यांच्या लग्नसोहळ्याची झलक पाहिला मिळतेय. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

5/8

नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या लग्नाचे पहिले फोटोही समोर आले आहेत. सोहळ्यातील वधू-वरांची शैली पाहण्यासारखी आहे. प्रत्येकाला नजर त्यांच्या खिळल्या आहेत. 

6/8

चैतन्य आणि शोभिता पारंपारिक पोशाखांमध्ये दिसून येत आहे. हिंदू रितीरिवाजांनुसार अभिनेत्याने त्याच्या लग्नासाठी ऑफ-व्हाइट धोती आणि कुर्ता परिधान केला होता.

7/8

तर शोभिता सोनेरी कांजीवरम साडी आणि पारंपारिक दागिने परिधान केलंय. बासिकम, माथापट्टी, बुल्लाकी आणि सूर्य-चंद्र आकृतिबंधांसह तिच्या ॲक्सेसरीजने परंपरेशी तिची खोल नाळ जोडल्याच दिसून येतं. 

8/8

लग्नापूर्वीचा विधींमध्ये पेली कुटुरू, पेली राता, मंगलास्नानम यावेळी देखील शोभिता पारंपारिक वेशात उठून दिसत होती.