वजन कमी करायचं आहे, पण गोड खायची इच्छाही आहे? 'हे' 5 डेजर्ट्स खा नाही वाढणार Weight

आपण अनेकदा पाहतो की जेवण झाल्यानंतर अनेकांना गोड खाण्याची इच्छा होते. ज्या लोकांना गोड खाण्याची इच्छा होते ते पूर्णपणे बंद करतात. पण त्या जागी तुम्ही हेल्दी डेजर्ट्स खाऊ शकतात. त्यानं तुम्ही आरामात वजन कमी करू शकतात. चला तर जाणून घेऊया रात्रीच्या जेवणानंतर कोणत्या हेल्दी गोड अशा गोष्टी खायला हव्या, ज्यानं तुमचं वजन वाढणार नाही. 

| Mar 02, 2024, 17:27 PM IST
1/7

चिया सीड्स

चिया सीड्समध्ये प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही चिया पुडिंग बनवण्यासाठी रात्रभर चिया सीड्स नारळाच्या किंवा बदामाच्या दुधात भिजवून ठेवा. सकाळी त्यात फळं किंवा मध घालून खा.   

2/7

दही - गूळ

दही प्रोटीन आणि कॅल्शियमचा एक चांगला सोर्स असतो. त्यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते. त्याशिवाय दही हे नॅच्युरल स्वीटनर आहे. दुपारच्या जेवणानंतर एक वाटी दही खा. त्यात थोडा गूळ घाला.   

3/7

स्ट्रॉबेरी

फक्त स्ट्रॉबेरी, ब्लूबेरीज आणि रासबेरीज यांच्यात फायबर आणि व्हिटामिन मोठ्या प्रमाणात असतात. जे वजन कमी करण्यास मदत होते.   

4/7

नारळाची मलाई

नारळाची मलाई एक पारंपरिक भारतीय मिठाई आहे ज्यात नारळाचं दूध, वेलची आणि थोडे ड्रायफ्रुट्स मिक्स करा. हे कमी गोडं असतं आणि त्यात सॅच्युरेट फॅटचे प्रमाण फार कमी असते. 

5/7

खजूर

खजूर हे नॅच्युरल स्विटनर आहे. त्यात फायबर, विटामिन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. तुम्ही खजूर असचं खाऊ शकतात. 

6/7

वजन कमी

वजन कमी करण्यासाठी कधीही जेवण  न करणं किंवा पूर्णपणे साखरेचं प्रमाण कमी करणं हे योग्य नाही.   

7/7

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)