जेवणानंतर 'ही' 5 कामे चुकूनही करु नका; होईल मोठा दुष्परिणाम

जेवणानंतरच्या काही सवयींचा आरोग्यावर विपरीत परिणाम होवू शकतो. 

Dec 08, 2023, 23:59 PM IST

Health Tips: निरोगी राहण्यासाठी सकस आणि पौष्टिक आहार गरजेचा आहे. तसेच जेवण वेळेवर करणे देखील गरजेचे आहे. अनेजण वेळेवर आणि उत्तम आहार घेतात. मात्र, जेवण केल्यानंतर काही सवयी आपले आरोग्य बिघडवू शकतात. जाणून घेवूया या सवयी.

1/7

निरोगी आरोग्यासाठी उत्तम आहार देखील गरजेचा आहे. मात्र, उत्तम आहारासह जेवण केल्यानंतर काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. 

2/7

जेवल्यावर लगेचच पाणी पिऊ नये. जेवल्यावर एक तासानंतर पाणी प्यावे. असे केल्यास अन्नपचन चांगल्या प्रकारे होते.  

3/7

जेवल्यानंतर अनेकांना झोपायची सवय असते. पण जेवल्यानंतर लगेचच झोपू नये. असे केल्यास अन्नपचन होत नाही. परिणामी ऍसिडिटीचे प्रमाण वाढते.

4/7

जेवनानंतर फळे किंवा सरबत यांचे सेवन टाळावे. फळे आणि ज्यूस यामुळे अन्नपचन व्यवस्थित होत नाही.

5/7

जेवल्यानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छ असेल तर ' डार्क चॉकलेट ' खावा. जेवल्यानंतर डार्क चॉकलेट खाल्याने अन्नपचन योग्य रित्या होते.

6/7

जेवणानंतर अनेकांना स्वीट्स म्हणून गोड खाण्याची सवय असते. जेवल्यानंतर लगेच गोड खाल्यास शरीरातील शुगरचे प्रमाण वाढते. यामुळे जेवणानंतर गोड पदार्थ खाणे टाळावे.   

7/7

जेवल्यानंतर लगेचच चहा किंवा कॉफी पिऊ नये.  असे केल्यास  जेवण पचन होत नाही. जेवल्यानंतर 'हर्बल टी' पिण्यास काही हरकरत नाही.