50 वर्षांची झाली ऐश्वर्या: विश्वास बसणार नाही, पण 'या' अभिनेत्रींनीही गाठली पन्नाशी!

50 plus bollywood actresses : बॉलिवूडची सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन आज तिचा 50 वा वाढदिवस साजरा करतेय. चला तर मग पाहूया बॉलिवूडमधील आणखी अशा अभिनेत्री ज्यांनी पन्नाशीचा टप्पा पार केला आहे. 

Nov 01, 2023, 13:21 PM IST

बॉलिवूडच्या झगमगाटीच्या दुनियेत अभिनेत्रींना नेहमी त्यांच्या लूक्स आणि फिटनेसवर लक्ष द्यावे लागते. पण काही अभिनेत्री वयाची पन्नाशी ओलांडूनही लूक्सच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना टक्कर देताना दिसतात. 

1/7

ऐश्वर्या राय बच्चन

1994 ची मिस वर्ल्ड, ऐश्वर्या ही सौंदर्याचा अवतार आहे. ऐश्वर्याने और प्यार हो गया या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासूनच, तिच्या सौंदर्याचे अनेकजण चाहते झाले. तिचा चार्म आजही चाहत्यांना तितकाच घायाळ करतो. एजिंग लाइक अ फाइन वाईन ही म्हण ऐश्वर्याच्या बाबतीत तंतोतंत जुळते. 

2/7

रविना टंडन

रवीना टंडनने सलमान खानसोबत 'पत्थर के फूल' या पहिल्या चित्रपटापासून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य केले आहे. चार मुलांची पत्नी आणि आई असलेल्या या पन्नाशीच्या डीवामध्ये  अजूनही तारुण्य कायम आहे.   

3/7

तबू

तबू ही बॉलिवूडमधील एक प्रतिभाशाली अभिनेत्री आहे. 51 वर्षांची असूनही ती आजही तितकीच सुंदर दिसते. 

4/7

माधुरी दीक्षित

धक-धक गर्ल माधुरीच्या सौंदर्याची नव्याने प्रशंसा करणाची गरजच नाही. ती दोन मुलांची आई असण्यासोबतच एक अभिनेत्री आणि एक नृत्यांगना आहे. वयानुसार माधुरीचे सौन्दर्यही वाढत चालले आहे असे म्हंटले तरी हरकत नाही.  

5/7

मलायका अरोरा

मलायका नेहमीच तिच्या स्टाइल आणि लूक्समुळे चर्चेत असते. तिच्या फिटनेसमुळे तिच्या वयाचा पत्ताच लागत नाही. 

6/7

मंदीरा बेदी

मंदिरा बेदी देशातील फिटनेस फ्रिक आदर्श मानली जाते. वयाच्या ५१ व्या वर्षीही मंदिराचा लुक हा तिशीतील आहे. एकही दिवस न चुकता मंदिरा व्यायाम करते. फिटनेसचे महत्त्व आपल्या आयुष्यात अधिक आहे हे तिने जाणले असून गेले अनेक वर्ष तिने आपले शरीर असेच तंदुरूस्त ठेवले आहे. 

7/7

निलम कोठारी

वय हा फक्त नंबर आहे हे निलम तिच्या सौंदर्याने सिद्ध करते.