Hardik Pandya ची मैदानाबाहेरही चर्चा, Photos आले समोर

भारतीय क्रिकेट टीमचा तडफदार खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा त्याची पत्नी नताशा (Natasha Stankovic) आणि मुलासोबत ग्रीसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतोय

Aug 12, 2022, 20:54 PM IST

मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा तडफदार खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा त्याची पत्नी नताशा (Natasha Stankovic) आणि मुलासोबत ग्रीसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतोय. सोशल मीडियावर हार्दिक पांड्याने हे फोटो शेअर केले आहेत. चला तर मग पाहूया व्हायर होत असलेले फोटोज...

1/5

आशिया कपसाठी भारतीय क्रिकेटर्सला येत्या 20 ऑगस्टला दुबईसाठी रवाना व्हायच आहे. वेस्टइंडिज दौऱ्यानंतर आशिया कप स्कॉडमध्ये अनेक खेळाडू त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत.

2/5

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) देखील याला अपवाद राहिला नाही. तो देखील त्याच्या कुटुंबियांसोबत ग्रीसमध्ये क्वालिटी टाईम स्पेंड करतोय.

3/5

 हार्दिक पांड्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय - हे माझं जग आहे.' हार्दिक आणि त्याच्या कुटुंबाचा हा फोटो ग्रीसमधील सॅंटोरिनीचा आहे. ज्याठिकाणी पांड्या मस्त सुट्टी घालवत आहे.

4/5

हार्दिकने फोटोच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलयं, " Once upon a time in Santorini"

5/5

हार्दिकने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला 2016सालापासून सुरुवात केली. 26 जानेवारी 2016ला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या टी-20 सामन्यात तो झळकला. त्यानंतर 16 ऑक्टोबर 2016 ला त्याने पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना साली न्यूझीलँड संघाविरुद्ध खेळाला.