1 तास 37 मिनिटांचा असा भयानक सस्पेन्स चित्रपट ज्याचा क्लायमॅक्स पाहून बसेल धक्का

हा चित्रपट प्रदर्शित होऊन बराच काळ झाला आहे, परंतु आजही हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंड करत आहे आणि आजही लोकांना तो पाहायला आवडतो.   

तेजश्री गायकवाड | Feb 09, 2025, 16:47 PM IST

हा चित्रपट प्रदर्शित होऊन बराच काळ झाला आहे, परंतु आजही हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंड करत आहे आणि आजही लोकांना तो पाहायला आवडतो. 

 

1/7

Best Suspense Mystery Movie: वेगेवगेळ्या विषयाचे जॉनरचे चित्रपट लोकांना बघायला आवडतात. काहींना रोमान्स असलेले तर काहींना ॲक्शन, थ्रिलर, सस्पेन्स आणि हॉरर चित्रपट आवडतात. पण हे सगळं एका चित्रपटात पाहायला मिळालं तर?  

2/7

हा चित्रपट प्रदर्शित होऊन बराच काळ झाला आहे, परंतु आजही हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंड करत आहे आणि आजही लोकांना तो पाहायला आवडतो.   

3/7

हा चित्रपट 5 वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि प्रदर्शित होताच या चित्रपटाने खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांच्या मनात घर करणारे फार कमी चित्रपट आहेत, पण या चित्रपटाने लोकांच्या मनात घर केले आहे. एक सामाजिक मुद्दाही या चित्रपटात दाखवण्यात आला होता, ज्याकडे कुणी लक्षही देत ​​नाही. पण या चित्रपटाने ते केले आणि चित्रपट खूप हिट ठरला.   

4/7

आपण 2020 मध्ये रिलीज झालेल्या 'बुलबुल' या सस्पेन्स थ्रिलर हॉरर चित्रपटाबद्दल बोलत आहोत. हा एक हिंदी सस्पेन्स हॉरर चित्रपट आहे, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन अन्विता दत्त यांनी केले आहे. हा चित्रपट अनुष्का शर्मा आणि कर्णेश शर्मा यांनी त्यांच्या क्लीन स्लेट फिल्म्स कंपनी अंतर्गत बनवला आहे.

5/7

या चित्रपटात तृप्ती डीमरी मुख्य भूमिकेत दिसली. अविनाश तिवारी, पाओली डॅम, राहुल बोस आणि परमब्रत चट्टोपाध्याय हे कलाकारही त्याच्यासोबत दिसत आहेत. ही कथा 1880 च्या बंगालमधील आहे.

6/7

एका बालवधूचा निष्पाप असण्यापासून ते सशक्त स्त्री होण्यापर्यंतचा प्रवास चित्रपटाच्या कथेत दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरी हिने बालवधू ते डायन बनण्यापर्यंतचा प्रवास आपल्या दमदार अभिनयाने दाखवला आहे. या चित्रपटासोबतच तृप्तीच्या अभिनयालाही प्रेक्षक आणि समीक्षकांनी भरभरून दाद दिली. चित्रपटात तो माणूस अनेक वर्षांनी आपल्या घरी परततो. तिथे आल्यानंतर त्याला कळते की त्याच्या भावाची बालवधू आता मोठी झाली आहे, पण त्याचा भाऊ तिला सोडून कुठेतरी गेला आहे.

7/7

तो ज्या मूळ गावात परतला आहे, तिथे लोक विचित्र पद्धतीने मरत आहेत, त्यामुळे गावात भीतीचे आणि गूढतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी तो रात्रंदिवस काम करतो. त्याला त्याची मेहुणी (तृप्ती) तसेच त्याच्याकडे वारंवार येणाऱ्या डॉक्टरांवर संशय येतो. हा चित्रपट बनवण्यासाठी फक्त 30 कोटी रुपये खर्च झाले. मात्र, हा चित्रपट मोठ्या स्क्रीनऐवजी OTT Netflix वर प्रदर्शित करण्यात आला, कारण कोरोनाचा काळ सुरू होता. त्याला 6.6 रेटिंग मिळाले आहे.