'याची देही याची डोळा...', प्राजक्ता माळी पोहोचली महाकुंभमेळ्यात; पवित्र स्नान करत सांगितला अनुभव

नुकतीच प्राजक्ता माळी महाकुंभमेळ्यात पोहोचली होती. पवित्र स्नान करून अभिनेत्रीने तेथील अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केलाय. 

Soneshwar Patil | Feb 09, 2025, 16:39 PM IST
1/7

प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. जगभरातून लोक महाकुंभमेळ्याला जात आहेत.   

2/7

राजकारणी, सेलिब्रिटीसह इतर लोक देखील महाकुंभमेळ्याला येऊन पवित्र स्नानाचा आनंद घेत आहेत. अशातच मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील तिथे पोहोचली. 

3/7

प्राजक्ता माळीने प्रयाराजयेथील काही विलक्षण क्षण तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने महाकुंभमेळ्याचा भारावणारा अनुभव दाखवला आहे. 

4/7

तिने कॅप्शनमध्ये, तीर्थराज - प्रयागराज #महाकुंभ #2025. लहानपणापासूनच कुंभ मेळ्याविषयी मनात कुतूहल होतं.

5/7

144 वर्षांनी होणारा हा मेळा याची देही याची डोळा पहावा, अनुभवावा असं मनात आलं आणि पोचले असं तिने म्हटलं आहे. 

6/7

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2024 मध्ये तिचा 'फुलवंती' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं. 

7/7

सध्या प्राजक्ता माळी ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचं सूत्रसंचालन करत आहे. यासोबतच ती 'चिकी चिकी बुबुम बुम' या चित्रपटात देखील झळकणार आहे.