इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न'च्या पहिल्याच दिवशी दिग्ग्जांची हजेरी, पहा फोटो

IFFM 2022 : कोरोनामुळे 2 वर्षांपासून  'इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न' वर्च्युअल स्वरुपात होत होता. पण यंदा दिमाखदार पद्धतीने सुरुवात झाली आहे. 

Aug 12, 2022, 20:20 PM IST

मुंबई : कोरोनामुळे 2 वर्षांपासून  'इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न' वर्च्युअल स्वरुपात होत होता. पण यंदा दिमाखदार पद्धतीने सुरुवात झाली आहे.  यंदाच्या इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न 2022 च्या पहिल्याच दिवशी अभिषेक बच्चन, वाणी कपूर, तमन्नाह भाटिया आणि तापसी पन्नू यांनी उपस्थितीत राहत महोत्सवाची शान वाढवली. यावेळी तमन्नाला साऊथ आणि हिंदी चित्रपटांच्या वादविवादाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर तिने प्रतिक्रियाही दिली. 

1/5

मेलबर्नचा भारतीय चित्रपट महोत्सव 2 वर्षांनंतर दिमाखदार पद्धतीने होतोय.  इंडियन फिल्म फेस्टिव्हल मेलबर्न 2022 चा सेलिब्रेशनला आज सकाळी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या एका प्रतिष्ठित लँडमार्कवर  कलाकारांनी  ध्वजवंदन केलं.  हा महोत्सव आजपासून12-20 ऑगस्ट पर्यंत असणार आहे.  

2/5

अभिषेक बच्चन, तापसी पन्नू, वाणी कपूर, तमन्ना भाटिया, शेफाली शाह, गायिका सोना महापात्रा आणि चित्रपट निर्माते अनुराग कश्यप, कबीर खान, अपर्णा सेन, निखिल अडवाणी आणि शूजित सरकार ऑफिशिअल लॉन्चला उपस्थित होते.

3/5

120 हून अधिक चित्रपटांचं स्क्रीनिंग

या महोत्सवामध्ये 120 हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन, स्वातंत्र्यदिनाचे समारंभ याशिवाय इतर रोमांचक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.   

4/5

मेलबर्न पाहण्यास उत्सुक : अभिषेक बच्चन

"शेवटी मी मेलबर्नमध्ये आहे.  मला ते खूप आवडतं. मी ते पुन्हा पाहण्यास उत्सुक आहे. जवळजवळ  माझ्या संपूर्ण कुटुंबाने याठिकाणी भारताचं प्रतिनिधित्व केलंय. याचा मला अभिमान आहे. उत्सव आणि मी याठिकाणी आल्याबद्दल सरकार आणि मीतूचे आभार मानतो", असं अभिषेक बच्चन म्हणाला.

5/5

तमन्ना काय म्हणाली?

"मी जेव्हा परदेशात असते तेव्हा लोकांमध्ये सिनेमांकडे हिंदी किंवा दाक्षिणात्य असं पाहण्याचा दृष्टीकोन नसतो. तर त्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन हा भारतीय सिनेमा असाच असतो. IFFM मध्येही असंच आहे. प्रेक्षकांना भारतीय सिनेमा पाहायचेत. त्यानुसार अनेक सिनेमांची निर्मिती केली जातेय. तसेच त्याचं कौतुकही होतंय", अशी प्रतिक्रिया तमन्नाने  दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमा याबाबत सुरु असलेल्या वादाबाबत दिली.