PHOTO : अनन्या पांडेसह 'या' बॉलिवूड अभिनेत्रींना केलं डेट, अभिनेता 10 वर्षांपासून एकही हिट न देता जगतोय आलिशान आयुष्य

Birthday Special : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या करिअरची सुरुवात फ्लॉप चित्रपटांनी झाली खऱी पण, नंतर काही हिट चित्रपटाने त्यांनी आपल्या एक चाहता वर्ग निर्माण केला. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत, ज्याने आपल्या 15 वर्षांच्या करिअरमध्ये 11 चित्रपटांमध्ये काम केलं, मात्र फक्त दोनच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरली. 

नेहा चौधरी | Nov 16, 2024, 14:51 PM IST
1/10

आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत त्याचा आज 16 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. सिनेसृष्टीमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी हा अभिनेता एक व्हीजे होता. त्याने सलमान खान, अजय देवगण यांच्या लंडन ड्रीम्स या चित्रपटातून केला.  

2/10

आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत, तुम्हाला कळलं असेलच ना. फोटोमध्ये दिसणारा हा चिमुकला आहे, 39 वर्षीय आदित्य रॉय कूपरबद्दल. लंडन ड्रीम्स हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. 

3/10

आदित्यला 2013 मध्ये आलेल्या 'आशिकी 2' चित्रपटातून मोठा ब्रेक मिळाला आणि तो रातोरात स्टार झाला. या चित्रपटातील तिची श्रद्धा कपूरसोबतची जोडी चाहत्यांना खूप आवडली. 

4/10

2013 मध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणच्या 'ये जवानी है दिवानी'मध्ये हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील दुसरा हिट चित्रपट ठरला. 'फितूर', 'दावत-ए-इश्क', 'ओके जानू', 'कलंक', 'मलंग', 'सडक 2', 'गुमराह' असे अनेक चित्रपट केले पण ते सर्व फ्लॉप झाले.

5/10

आदित्यचा लव्ह लाइफबद्दल बोलायचं झालं तर त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. आदित्य रॉय कपूरचे नाव बॉलिवूडची तरुण अभिनेत्री अनन्या पांडेसोबत जोडले गेले होते. त्यांच्यात डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या. अनन्या आदित्यपेक्षा 13 वर्षांनी लहान होती. मीडिया रिपोर्टनुसार काही कारणामुळे या दोघांचं ब्रेकअप झालं. 

6/10

आदित्यचं नाव श्रद्धा कपूरशीही जोडलं गेलं होतं. आशिकी 2 नंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चा जोरदार रंगल्या होत्या. मात्र या दोघींनी आपल चांगले मित्र असल्याच सांगून या चर्चांना ब्रेक लावला. 

7/10

आदित्य रॉय कपूरचे नाव आणखी एक अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबतही जोडले गेले होते. यापूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये असलेली रिया आदित्यसोबतही दिसली होती. यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र, आदित्य आणि रियाने याला फक्त मैत्री असल्याचे म्हटले आणि अफेअरच्या अफवांचे खंडन केले.

8/10

आदित्य रॉय कपूरचे नाव बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफसोबतही जोडले गेले होते. या दोघांनी 'फितूर' चित्रपटात एकत्र काम केले होते आणि या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या जवळ आल्याचे बोलले जात आहे. मात्र, दोघांनीही या नात्याबद्दल कधीच काही सांगितले नाही.

9/10

आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्यात अफेअर असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. कलंक या चित्रपटादरम्यान दोघेही चांगले मित्र बनले होते आणि या चित्रपटानंतर त्यांचे नाते आणखीनच वाढले असल्याचे सांगितले जाते. मात्र, आदित्य आणि सोनाक्षी यांनी या नात्याबद्दल कधीच उघडपणे बोलले नाही.

10/10

आदित्य रॉय कपूरने 11 वर्षांपासून एकही हिट चित्रपट दिलेला नाही. त्याच्यावर फ्लॉप अभिनेता हा टॅग असला तरी तो एका चित्रपटासाठी तगडी रक्कम मोजतो. डीएनएनुसार, आदित्य रॉय कपूर त्याच्या एका चित्रपटासाठी 7 कोटी रुपये फी घेतो. त्याच्याकडे स्वतःचे आलिशान घर आणि एक अद्भुत कार संग्रह आहे. त्यांची एकूण संपत्ती 89 कोटींच्या घरात आहे.