जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री, 44 वर्षांच्या करिअरमध्ये एकही हिट चित्रपट नाही, तरीही 66000 कोटींची मालकीण

जगातील सर्वात श्रीमंत कलाकार म्हटलं की सलमान खान, शाहरुख खान यांचे नाव समोर येते. पण तुम्हाला माहिती आहे का की, एकही हिट चित्रपट न देता ही अभिनेत्री 66 हजार कोटींची मालकीण आहे.

Soneshwar Patil | Nov 16, 2024, 13:38 PM IST
1/6

जगातील श्रीमंत अभिनेत्री

हिंदी चित्रपटांपासून ते साउथ आणि हॉलीवूडमधील अनेक कलाकारांचे नाव जगातील श्रीमंतांच्या लिस्टमध्ये आहे. 

2/6

कलाकार

आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहेत. जिने नेटवर्थमध्ये बॉलिवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत अनेक कलाकारांना मागे टाकले आहे.   

3/6

40 पेक्षा जास्त चित्रपट

या अभिनेत्रीने तिची करिअरची सुरुवात 1981 पासून केली होती. आता तिला इंडस्ट्रीमध्ये 44 वर्षे पूर्ण झाली आहेत. तिने आतापर्यंत 40 पेक्षा जास्त चित्रपटात काम केलं आहे. 

4/6

जैमी गर्ट्ज़

या अभिनेत्रीचे नाव जैमी गर्ट्ज़ आहे. तिचा जन्म अमेरिकेत झाला आहे.  तिने 44 वर्षांच्या करिअरमध्ये एकही हिट चित्रपट दिला नाही. तरीही ती 66 हजार कोटींची मालकीण आहे.

5/6

टोनी रेस्लरसोबत लग्न

सिटकॉम 'स्टिल स्टैंडिंग'मधील अभिनयाने तिला प्रसिद्धी मिळाली. परंतु तिची इतकी संपत्ती ही अभिनयातून नाही तर तिचा पती टोनी रेस्लरसोबत लग्न केल्याने मिळाली आहे. 

6/6

एकूण संपत्ती

टोनी रेस्लर हे अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट या गुंतवणूक फर्मचे सह-संस्थापक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 10.5 बिलियनपेक्षा जास्त आहे.