PHOTO : मित्राच्या लग्नात सारा अली खानचा लाल साडीमध्ये जलवा, हातावरील मेहंदीची होतेय चर्चा

अलीकडेच सारा अली खान तिच्या एका मित्राच्या लग्नाला उपस्थित राहिली होती. सध्या तिचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Soneshwar Patil | Feb 09, 2025, 16:09 PM IST
1/7

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने खूप कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्रीचा अभिनय आणि साधेपणा चाहत्यांना खूप आवडतो.

2/7

नुकतीच ती तिच्या एका मित्राच्या लग्नाला उपस्थित राहिली होती. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

3/7

अभिनेत्रीने मित्राच्या लग्नात नवविवाहित वधूसारखी वेशभूषा केली होती. यासोबतच अभिनेत्रीने तिच्या हातांवर खास मेहंदी काढली होती. जी सध्या चर्चेत आली आहे. 

4/7

या लग्नाला इब्राहिम खान देखील उपस्थित होता. दोघांनीही लग्नाचा खूप आनंद घेतला. अभिनेत्रीने लाल रंगाची साडी परिधान केली होती. 

5/7

यासोबतच साराने केसांमध्ये वेणी घालून आणि आकर्षक दागिने परिधान करून तिचा लूक पूर्ण केला होता. तर साराने तिच्या हातांवर भोलेनाथचे नाव लिहिले होते. 

6/7

लग्नातील सर्व फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यासोबतच तिने कॅप्शनमध्ये, दोघांनी आयुष्यभर एकत्र राहावे, प्रेम, हास्य, आनंद आणि जय भोलेनाथ असं म्हटलं आहे. 

7/7

अभिनेत्री सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची विजय वर्मासोबत 'मर्डर मुबारक' या चित्रपटात दिसली होती.