'मला तिच्याकडून खूप प्रेम मिळालं आणि...', पुनमसोबत लग्न आणि रिना रॉयसोबत रिलेशनशिपवर शत्रुघ्न सिन्हा यांचं वक्तव्य

बॉलिवूडचे शॉट गन अशी ओळख असणारे शत्रुघ्न सिन्हा यांनी 80 चं दशक गाजवलंय. या काळात ते करिअरच्या शिखरावर होते. त्यावेळी त्यांचं आणि त्यांची सह-कलाकार रीना रॉय यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. एकीकडे त्यांनी पूनम सिन्हासोबत लग्न करणार असल्याची घोषणा केली. तर आता इतक्या वर्षांनंतर त्यांनी खासगी आयुष्यावर एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळी सांगितलं की एकावेळी दोन महिलांना डेट केल्यानं आता वाईट वाटतंय. 

Diksha Patil | Feb 09, 2025, 15:55 PM IST
1/8

शत्रुघ्न सिन्हा यांनी Lehren Retro ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यावर अनेक खुलासे केले आहेत. यामुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांना पत्नी पूनम आणि रिना रॉय यांच्यासोबतचं नात्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी विचारलं की तुम्ही या आधी अर्थात भूतकाळात एक विधान केलं होतं की तुमचे पाय दोन वेगवेगळ्या बोटींमध्ये आहेत. 

2/8

त्या प्रश्नावर उत्तर देत शत्रुघ्न सिन्हा उपहासात्मकपणे म्हणाले, 'दोन वेगवेगळ्या बोटी? मी म्हणेन, कधीकधी मी अनेक बोटींमध्ये होतो. मी नावं घेणार नाही. पण माझ्या आयुष्या ज्या कोणत्या महिला होत्या त्यांचा मी ऋणी आहे. त्या पैकी कोणा विषयी माझ्या मनात कोणताही द्वेष नाही.

3/8

पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की 'मी त्यांच्याविषयी कधीही वाईट विचार करत नाही. या सर्वांनी मला आयुष्यात मोठं होण्यास आणि एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत केली आहे. माझ्याकडून नक्कीच चुका झाल्या आहेत.' 

4/8

पुढे स्टारडम विषयी बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, 'पाटण्याहून आलेल्या मुलाचं इंडस्ट्रीतील चकचकीत आणि ग्लॅमरमध्ये हरवून जाणं हे स्वाभाविक होतं. स्टारडम कसं सांभाळायचं हे मला माहित नव्हतं. या सगळ्यात लोक हरवून जातात. मला मार्गदर्शन करण्यासाठी माझ्याकडे कोणी पालक नव्हता. मात्र, पूनम माझ्या आयुष्यात आल्यानंतर तिने मला खूप मदत केली.' 

5/8

Love Triangle विषयी बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, 'मला नाव घ्यायचं नाही, परंतु या व्यक्तीसोबत जे काही घडत होतं. मी तिचा ऋणी आहे. मला तिच्याकडून खूप प्रेम मिळालं आहे, खूप काही शिकायला मिळालं आहे. माझी काहीही तक्रार नाही.' 

6/8

याविषयी पुढे बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, 'जेव्हा एखादा माणूस मनाने चांगला असतो आणि तो एकाच वेळी दोन वचनबद्ध नातेसंबंध जोडत असतो. त्यावेळी त्यालाही यासगळ्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या बाबतीत खूप त्रास होतो. तुम्हालाही अपराधी असल्याचं वाटतं. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत बाहेर असता, तेव्हा तुम्हाला घरात तुमच्या पत्नीसाठी अपराधी वाटतं आणि जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीसोबत असता तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रियकरासाठी वाईट वाटतं. तिला खेळणं बवनून का ठेवलं आहे?’.

7/8

त्यांनी नंतर मान्य केलं की 'मला हे सांगायचं आहे की, Love Triangle मध्ये असलेल्या मुलींनाच त्रास होत नाही, तर पुरुषालाही तितकाच त्रास सहन करावा लागतो. त्यांची इच्छा असतानाही तो परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी धडपडतो.'

8/8

पुढे शत्रुघ्न यांना विचारण्यात आलं की तू रीना रॉयवर रोमान्स करत होतास, पण तू पूनमशी लग्न केलेस का? तर त्यावर उत्तर देत शत्रुघ्न म्हणाला, 'कधीकधी आयुष्यात, एखादी व्यक्ती अशा टप्प्यावर पोहोचते जिथे निर्णय घेणे खूप कठीण होते. पण एकदा निर्णय घेतला की तो नेहमीच सर्वांच्या बाजूने नसतो.'