अंबानींच्या शाळेतून शिक्षण, तब्बल 12 यूट्यूब चॅनलचा मालक, Youtuber रणवीर अल्लाहबादियाची संपत्ती पाहून डोळे फिरतील

Ranveer Allahbadia Net Worth : प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया त्याच्या एका वक्तव्यामुळे वादात अडकला आहे. कॉमेडियन समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील एका नव्या एपिसोडमध्ये त्याने केलेल्या एका अश्लील प्रश्नावरून तो सध्या ट्रोल होतोय. एवढंच नाही तर त्याच्या विरुद्ध FIR सुद्धा रजिस्टर करण्यात आलंय. रणवीर अल्लाहबादिया हा त्याच्या पॉडकास्टमध्ये व्यवसाय, खेळ, मनोरंजन इत्यादी अनेक क्षेत्रातील प्रसिद्ध लोकांच्या मुलाखती घेताना दिसतो. युट्यूबवर तब्बल 12 चॅनल असणाऱ्या रणवीर अल्लाहबादियाची एकूण संपत्ती किती याबाबत माहिती जाणून घेऊयात. 

Pooja Pawar | Feb 10, 2025, 16:58 PM IST
1/7

कॉमेडियन समय रैनाच्या शोमधील एका स्पर्धकाला रणवीरने एक वादग्रस्त आणि अश्लील प्रश्न विचारला. यात त्याने सांगितले की, 'तुम्ही संपूर्ण आयुष्यात प्रत्येक दिवशी तुमच्या पालकांना इंटिमेट होताना पाहू इच्छिता की एकदा त्यांना जॉईन करू इच्छिता? या प्रश्नानंतर सोशल मीडियावर रणवीरला खूप ट्रोल केलं जातं आहे. तसेच यामुळे त्याच्या विरुद्ध FIR सुद्धा रजिस्टर करण्यात आलंय.

2/7

2 जून 1993 मध्ये मुंबईत रणवीर अल्लाहबादियाचा जन्म झाला होता. त्याच संपूर्ण शिक्षण हे धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलमध्ये झालं. द्वारकादास जीवनलाल संघवी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग से इलेक्ट्रॉनिक्स और दूरसंचार में बी.टेक चं शिक्षण पूर्ण केल्यावर 22 व्या वर्षी त्याने आपलं यूट्यूब चॅनल सुरु केलं. 

3/7

रणवीर अल्लाहबादिया जवळपास 12 चॅनल चावलतो ज्यापैकी एक Beerbiceps देखील आहे. त्याच्या चॅनलवर एक कोटींहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. 

4/7

कोईमोईनुसार रणवीर अल्लाहबादिया त्याचं चॅनल बीयरबाइसेप्स सहित इतर चॅनलमधून 35 लाख रुपयांहून अधिक कमाई करतो. याशिवाय त्याची कमाई यूट्यूब ऍड, रॉयल्टी, ब्रँड प्रमोशन इत्यादीतून देखील होत असते. यासह रणवीरचे अनेक व्यवसाय देखील आहेत.   

5/7

वर्ष 2024 मध्ये रणवीर अल्लाहबादियाची एकूण संपत्ती ही 60 कोटी रुपये इतकी होती. यासोबतच तो Monk Entertainment चा सह-संस्थापक सुद्धा आहे. 

6/7

कोट्यवधीची कमाई करणाऱ्या रणवीर अल्लाहाबादियाच मुंबईत आलिशान घर असून त्याशिवाय स्कोडा कोडियाक कार सुद्धा आहे. ज्याची किंमत सुमारे 39.99 लाख रुपये आहे. 

7/7

यूट्युबर रणवीर अल्लाहाबादियाच्या 12 चॅनलवर एकूण 6 बिलियन व्ह्यूज आहेत. रणवीर अल्लाहाबादिया त्याच्या लाईफस्टाईल आणि पॉडकास्टमुळे नेहमी चर्चेत असतो. अल्लाहाबादियाला नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डने सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे.