मुलांना 'या' 7 सवयी लावतात आयुष्यभराची शिस्त; कधीच येणार नाही त्यांच्यावर ओरडण्याची वेळ

Parenting Tips : मुलांना शिस्त लावायची असेल तर 7 सवयी नक्की लावा.   

लहान मुलांना शिस्त लावताना अनेकदा पालकांच्या नाकी नऊ येतात. मुलांना ओरडलं तरीही त्यांच्यावर चुकीचे संस्कार होतात आणि ओरडलं नाही तर मुलं त्याचा गैरफायदा घेतात. अशावेळी मुलांना शिस्त कशी लावायची हा प्रश्न पालकांना पडलेले असताना फॉलो करा या टिप्स. 

1/6

बॅग भरायला लावणे

पालकांनी मुलांना शिस्त लावण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यापेक्षा काही विशेष सवयी लावणे महत्त्वाचे आहे. त्यातलीच एक सवय म्हणजे मुलांना बॅग भरायला लावणे . अगदी शाळेची बॅग असो किंवा रोजची खेळणी भरायची असो. मुलांना छोट्या मोठ्या सवयी लावणे गरजेचे असते.   

2/6

स्वातंत्र्य द्या

मुलांना अगदी लहानपणापासूनच काही गोष्टींचं स्वातंत्र्य द्या. जसे की, स्वतःचे अलार्म स्वतः लावू द्या. तसेच मुलांना स्वतःचे नियम लावण्याची सवय लावू द्या. त्यांना स्वतःला आपला दिवस ठरवू द्या. मग तो उठण्याचा अलार्म असो किंवा अभ्यासाची वेळ.   

3/6

बेड टाईम रुटिन

अनेक पालक मुलांना काही सवयी लावतात. त्याऐवजी तुम्ही मुलांना स्वतःचा बेड टाईम रुटीन तयार करायला लावा. म्हणजे त्यांचे नाईट ड्रेस, झोपताना कोणते पुस्तक वाचायचे त्याच्या सवयी ते स्वतः लावून घेतील. 

4/6

​स्वतःची कामं स्वतः करु द्या

जसे की मुलांना स्वातंत्र्य देताना ते विचारांचे असणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. मग ते लायब्ररीमधील पुस्तकं असू दे किंवा कोणता खेळ खेळायचा. मुलांना त्यांचं स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. 

5/6

दोन पर्याय द्या

मुलांना कायमच आपल्या बुद्धीने निवड करण्याच स्वातंत्र्य द्या. त्यांच्यासमोर कायम दोन पर्याय द्या. म्हणजे ते विचार करुन आपली बुद्धीचा वापर करुन एका गोष्ट निवडू शकतात. 

6/6

छोट्या जबाबदाऱ्या द्या

मुलांवर छोट्या छोट्या जबाबदाऱ्या द्या. जसे की, पाहुणे आल्यावर त्यांना पाणी द्या. बाहेरुन आजी-आजोबा आल्यावर त्यांच्या पिशव्या घेणे. घरा बाहेर जाताना किल्ल्या घेतल्या आहेत