उन्हाळ्यात मुलांची कशी घ्याल काळजी?
Parenting Tips : लहान मुलांना उन्हाळ्यात सर्वाधिक जपणे गरजेचे असते. अशावेळी लहान मुलांची कशी काळजी घ्यावी.
Health Tips : लहान मुलांना प्रत्येक ऋतूत फार जपावं लागतं. अशावेळी उन्हाळ्यात त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. अगदी त्यांच्या पाणी पिण्याच्य सवयींपासून ते कपड्यांपर्यंत सगळीच काळजी घ्यावी लागते. अशावेळी डॉ. शुभांगी घोगरे यांनी दिलेल्या टिप्स फॉलो करा.
1/7
उन्हाळ्याचा होतो त्रास
उन्हाळा वाढू लागला आहे. घराबाहेर पडल्यावर उन्हाचा तडाखा जाणवू लागतो. अशावेळी पालकांनी मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण अनेकदा लहान मुलांना हवामानातील बदल सहज कळत नाहीत. या काळात मुलांना सनबर्न, घोळणा फुटणे, डिहायड्रेशन, किटक दंश, उन्हाळी लागणे, घामोळा यासारख्या समस्या जाणवू लागतात. View this post on Instagram A post shared by The Baby Fam - Pregnancy + Parenting Guidance (@thebabyfamindia)
2/7
कपडे
उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये मुलांना सुती, फिरक्या रंगाचे व पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत. तसेच मुलांना बाहेर नेताना टोपी आणि सनग्लासेस वापरु द्या. भर उन्हात मुलांना नेत असाल तर सनस्क्रिनचा वापर करा. अगदी तान्ही मुलं असतील तर लंगोट बदलल्यानंतर काही वेळ त्यांना हवेवर मोकळं ठेवा.. डायपर वापरत असाल तर कापडी आणि सुती डायपरचा वापर करा.
3/7
पाणी
4/7
लहान मुलांना घराबाहेर काढणे टाळा
तज्ज्ञांच्या मते, सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तीव्र सूर्यप्रकाश असतो. अशा परिस्थितीत लहान मुलांना चुकूनही घराबाहेर काढू नका. मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे आणि ते सहजपणे आजारी पडू शकतात. जर तुम्हाला त्यांना बाहेर घेऊन जायचे असेल तर त्यांना हलक्या रंगाचे आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घाला, त्यांच्या चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी टोपी घाला आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्री ठेवा. आजकाल लहान मुलांसाठीही सनस्क्रीन बाजारात उपलब्ध आहेत, ज्याचा वापर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता.
5/7
मुलांना जास्त कपडे घालू नका
6/7
बेड आणि स्ट्रॉलर योग्यरित्या निवडा
तुमचे बाळ जेथे झोपते किंवा त्याचा बराचसा वेळ ज्या ठिकाणी जातो ती जागा आरामदायक तसेच थंड ठेवा. सॅटिन किंवा गरम चादरीमुळे मुलाचे शरीर लवकर गरम होईल, अशा परिस्थितीत, कॉटनचे कपडे निवडणे चांगले आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलासाठी स्ट्रॉलर खरेदी करता तेव्हा त्याच्या फॅब्रिककडेही लक्ष द्या. त्याचे कापड नायलॉनसारखे हलके फॅब्रिकचे असावे. बाहेर विकले जाणारे स्ट्रोलर्स आणि क्रिब्स भारतीय तापमानासाठी योग्य नाहीत. गरम हवामानात, स्ट्रॉलरचे फॅब्रिक देखील गरम होण्यास सुरवात होईल, ज्यामुळे मुलाला श्वास घेणे कठीण होईल. आपल्या बाळाला गरम कारमध्ये कधीही सोडू नका, अगदी काही सेकंदांसाठीही.
7/7