1 तास 40 मिनिट, एका मूक-बधिर मुलीची कथा दाखवणाऱ्या हॉरर-सस्पेन्स चित्रपटासमोर 'बदला' आणि 'दृश्यम' देखील फेल!

जर तुम्हाला OTT वर चित्रपट पाहण्याचे वेड असेल, तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम सजेशन घेऊन आलो आहोत. एक असा चित्रपट ज्यामध्ये निर्मात्यांनी भयपट, थ्रिलर तसेच सस्पेन्स यांचे उत्तम मिश्रण तयार केले आहे. या सिनेमाची कथा भक्कम असून दिग्दर्शन आणि अभिनयही उत्तम आहे. 

| Jan 08, 2025, 13:12 PM IST

Horror Thriller Film: जर तुम्हाला OTT वर चित्रपट पाहण्याचे वेड असेल, तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम सजेशन घेऊन आलो आहोत. एक असा चित्रपट ज्यामध्ये निर्मात्यांनी भयपट, थ्रिलर तसेच सस्पेन्स यांचे उत्तम मिश्रण तयार केले आहे. या सिनेमाची कथा भक्कम असून दिग्दर्शन आणि अभिनयही उत्तम आहे. 

1/7

1 तास 40 मिनिट, एका मूक-बधिर मुलीची कथा दाखवणाऱ्या हॉरर-सस्पेन्स चित्रपटासमोर 'बदला' आणि 'दृश्यम' देखील फेल!

2/7

OTT वरचा सस्पेन्स-थ्रिलर आणि हॉरर चित्रपट

तुम्ही OTT वर चित्रपट शोधत असाल पण कोणते पाहावे आणि कोणते नाही हे समजत नसेल तर तुम्ही काय बघायला हवं ते सांगत आहोत. आज आम्ही सस्पेन्स-थ्रिलरने भरलेला एक हॉरर चित्रपट घेऊन आलो आहोत, ज्याची कथा तुम्हाला नक्कीच आवडेल.

3/7

साउथ थ्रिलर चित्रपट

'कोलयुतीर काळम' असे या चित्रपटाचे नाव आहे. हा एक तमिळ भाषेतील चित्रपट आहे जो 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. कोलयुतीर काळम म्हणजे 'हत्येचा हंगाम'. नावावरूनच स्पष्ट होते की, हत्येशी संबंधित एक कथा असणार आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे यात तुम्हाला एकही पुरुष सुपरस्टार दिसणार नाही.

4/7

चित्रपटात आहेत दोन लेडी सुपरस्टार

साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तर तेरे नाम फेम भूमिका चावला तिच्यासोबत आहे. दोघांची जोडी तुम्हाला आवडेल. त्याच्यासोबत प्रताप के पोथेन आणि रोहिणी हट्टंगडीही दिसले. या चित्रपटाचे दिग्दर्शन चक्री टोलेटी यांनी केले आहे.

5/7

हॉरर थ्रिलर चित्रपट

कोलायउथिर काळम हा एक भयपट थ्रिलर चित्रपट आहे जो सस्पेन्सने भरलेला आहे. हा 2016 मध्ये आलेल्या हॉलिवूड चित्रपट 'हुश'चा रिमेक आहे. यामध्ये  एक मूकबधिर स्त्री तिच्या आयुष्यात अनेक आव्हानांना तोंड देताना दिसते. ही भूमिका नयनताराने स्वतः साकारली आहे.  

6/7

चित्रपटाची कथा

चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर हा चित्रपट श्रुती (नयनतारा) भोवती फिरतो. श्रुती ना ऐकू शकते ना बोलू शकते. मूकबधिर मुलीचे पालनपोषण अनाथाश्रमात झाले. एकदा ही होतकरू मुलगी एक करोडपतीने दत्तक घेतात . पण श्रुती लंडनमधील बंगल्यावर पोहोचताच कथा पूर्णपणे बदलते. अनेक विचित्र गोष्टी घडतात. ही कथा भीती आणि सस्पेन्सने पुढे जाते.  

7/7

इंटरेस्टिंग कथा

बंगल्यात कोणीतरी तिचा पाठलाग करत असल्याचा भास श्रुतीला होतो. कधी आग लागते तर कधी अजून काही विचित्र गोष्टी घडतात.