मजाच मजा! 15 ऑगस्टपासून रक्षाबंधनपर्यंत; लॉंग विकेंडला फिरणाऱ्यांसाठी रेल्वेकडून 18 स्पेशल ट्रेन!
मध्य रेल्वेने 18 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.एलटीटी मुंबई ते नागपूर,एलटीटी, मुंबई ते मडगाव,सीएसएमटी, मुंबई ते कोल्हापूर,पुणे ते नागपूर आणि कलबुर्गी ते बेंगळुरू या मार्गावर स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत.
Pravin Dabholkar
| Aug 14, 2024, 11:51 AM IST
Raksha Bandhan Special Train:मध्य रेल्वेने 18 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.एलटीटी मुंबई ते नागपूर,एलटीटी, मुंबई ते मडगाव,सीएसएमटी, मुंबई ते कोल्हापूर,पुणे ते नागपूर आणि कलबुर्गी ते बेंगळुरू या मार्गावर स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत.
1/11
15 ऑगस्टपासून रक्षाबंधनपर्यंत; लॉंग विकेंडला फिरणाऱ्यांसाठी रेल्वेकडून 18 स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय

Raksha Bandhan Special Train: प्रवासाची आवड असलेल्या पर्यटकांसाठी ऑगस्ट महिन्यातील हा वीकेंड म्हणजे आनंदाची पर्वणी आहे. 15 ते 19 ऑगस्टदरम्यान स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन यांसारख्या प्रमुख सणांमुळे सुट्ट्या मिळाल्या आहेत.आठवड्यातील 5 दिवस सुट्ट्या घेत अनेकजण फिरण्याचा प्लान आखतायत.पर्यटकांसाठी मध्य रेल्वेनेही 18 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.एलटीटी मुंबई ते नागपूर, एलटीटी, मुंबई ते मडगाव,सीएसएमटी, मुंबई ते कोल्हापूर,पुणे ते नागपूर आणि कलबुर्गी ते बेंगळुरू या मार्गावर स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत.
2/11
LTT मुंबई-नागपूर एसी सुपरफास्ट स्पेशल (2 सेवा)

02139 एसी सुपरफास्ट स्पेशल एलटीटी मुंबई 15 ऑगस्ट रोजी (गुरुवार) रोजी 00.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी साडे तीन वाजता नागपूरला पोहोचेल. 02140 एसी सुपरफास्ट स्पेशल नागपूरहून 16 ऑगस्ट(शुक्रवार) रोजी दुपारी दीड वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 4 वाजून 10 मिनिटांनी एलटीटी मुंबईला पोहोचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबेल. ज्यामध्ये एक AC-फर्स्ट क्लास, 3 AC-2 टियर, 15 AC-3 टियर, 1 पँट्री कार (लॉक अवस्थेत) आणि 2 जनरेटर कार आहेत.
3/11
LTT मुंबई-मडगाव विशेष (4 सेवा)

4/11
कुठे थांबेल?

मार्गावरील ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर (फक्त 01168 साठी), खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड (फक्त 01168 साठी), संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे (फक्त 01168 साठी) मार्गे जाते. ), राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव (फक्त 01168 साठी), आणि कणकवली. ज्यामध्ये 2 AC-2 टियर, 6 AC-3 टियर, 8 स्लीपर क्लास आणि 4 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये 1 गार्ड ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर कार समाविष्ट आहे.
5/11
सीएसएमटी-कोल्हापूर विशेष (2 सेवा)

01417 विशेष गाडी 20 ऑगस्ट (मंगळवार) रोजी 00.20 वाजता CSMT मुंबई येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी दीड वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे पोहोचेल. 01418 स्पेशल श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून 18.08.2024 (रविवार) रोजी 22.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 13.30 वाजता CSMT मुंबईला पोहोचेल.
6/11
कुठे थांबेल?

7/11
पुणे-नागपूर एसी सुपरफास्ट स्पेशल (4 सेवा)

02143 एसी सुपरफास्ट स्पेशल पुण्याहून 15.08.2024 (गुरुवार) आणि 17 ऑगस्ट (शनिवार) रोजी संध्याकाळी 4 वाजून 10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता नागपूरला पोहोचेल. 02144 सुपरफास्ट स्पेशल नागपूरहून 14.08.2024 (बुधवार) आणि 16 ऑगस्ट (शुक्रवार) रोजी संध्याकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी पुण्याला पोहोचेल.
8/11
कुठे थांबेल?

9/11
कलबुर्गी-बेंगळुरू विशेष (6 सेवा)

06534 स्पेशल कलबुर्गी येथून 15 ऑगस्ट (गुरुवार), 17 ऑगस्ट (शनिवार) आणि 18 ऑगस्ट (रविवार) रोजी सकाळी 9 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 2 वाजता सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल, बेंगळुरू येथे पोहोचेल. (३ सेवा)06533 स्पेशल 14 ऑगस्ट (बुधवार), 16 ऑगस्ट रोजी (शुक्रवार) आणि 17 ऑगस्ट (गुरुवार) रोजी रात्री सव्वा नऊ वाजता सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल, बेंगळुरू येथून निघेल आणि कलबुर्गीला पुढील दिवशी 5.4.4 वाजता पोहोचेल.
10/11
कुठे थांबेल?

11/11
कशी कराल बुकींग?
