सुरेंद्र गांगण
gangan.surendra@gmail.com
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोललेत आणि व्यक्तव्याचा भडकाच उडाला. महाराष्ट्रात नेत्यांची वैचारिक अधोगती झाली आहे का? यावर चर्चा झडल्यात. सामान्यांना पडलेला प्रश्न महाराष्ट्रातील नेत्यांना झालंय तरी काय?, महाराष्ट्राची संस्कृती आणि शिस्त याला बाधा पोहचविण्याचं काम हे राजकीय नेतमंडळी करीत आहेत का?, असे कितीतरी प्रश्न मनात घर करून राहिलेत. त्याची उत्तरे कोण देणार. शरद पवार, बोला! कारण तुमचा पुतण्या बोलला आणि राजकीय वातावरणाबरोबरच महाराष्ट्र पुरता ढवळून निघाला.
माझा महाराष्ट्र बिघतोय, असं आता वाटू लागलेय. इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बेताल वक्तव्य केलं आणि राज्यातील विचारांचा गलका झाला. अजित पवार चुकले. त्यांनी माफी मागण्यास उशीर केला. तोपर्यंत मीडियामुळे अजित पवारांची टगेगिरीची भाषा देशात पोहोचली. चहुबाजुनी टीका होऊ लागली. टीका करणे योग्य आहे. मात्र, टीकाही बेताल व्यक्तव्याच्या भाषेतच होऊ लागली. त्याचवेळी राजकीय नेत्यांच्या अकल्लेचे तारे समस्त जनतेला कळले. राजकारणात मुरलेले नेते बरळतायेत असंच चित्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. हे भक्कम असलेल्या लोकशाहीला घातक आहे.
महाराष्ट्रातील नेत्यांचं सूऽऽऽराज्य. अजित पवारांनी त्याचा पाया रचला. दुष्काळात दिवस काढताना काय यातना भोगाव्या लागतात त्याची कल्पना जो दुष्काळात दिवस काढतो त्यालाच समजताच. महाराष्ट्रात दुष्काळ आहे, हे मान्य. मात्र, हा दुष्काळ मानव निर्मित असल्याचा आता वास येऊ लागला आहे. कारण उजनी धरणात पाणीच नाही, असं सांगणारे अजित पवार तोंडावरच आपटलेत. न्यायालयाने उजनीतील पाणी सोडण्यास आदेश दिले. तसेच बारामतीतील डेअरिला धरणातील पाणी नेण्याचा घाट घातला जातो. त्यामुळे हा दुष्काळ राजकर्त्यांच्या ना कर्तेपणाचा आहे, हे सांगण्याची गरज नाही. निवडणुका आल्या की, गरिब आणि सामान्य लोकांना आश्वासनांची स्वप्ने दाखविली जातात. मात्र, ती सत्यात उतरत नाहीत. वजनदार नेतेमंडळींच्या गावात विकासाची गंगा वाहते. त्याठिकाणी कधी दुष्काळ पडलेला दिसत नाही. जरी पडला तरी आपले वजन वापरून अधिकाऱ्यांना कामाला लावले जाते आणि आपली पोळी भाजून घेतली जाते. यात काहीप्रमाणात लोकांचा प्रश्न सुटतो, तो भाग याला अपवाद.
राज्यातात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांबाबत तेच जास्त प्रमाणात जबाबदार आहेत. त्यानंतर विरोधी पक्ष. आता निवडणुका जवळ आल्यानंतर दुष्काळग्रस्त भागात मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याचे दिसून येत आहे. लोकांना गटाराचे तसेच नदीतील सांडपाण्यावर आपली तहाण भागवावी लागत आहे. ही शोकांतिका आहे. मध्यंतरी नद्या जोड प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली. त्याचे पुढे काय झाले? एकाद्याला श्रेय मिळेल म्हणून जे सत्तेत असतात ते विकासकामे थांबवितात. मात्र, ते प्रत्यक्षात विकास करीत नाहीत. विकासात खोडा घालण्याचा उद्योग करतात. अनेक ठिकाणी प्रकल्प आला की लोकांची माथी भडकावून विरोध करताना आपली राजकीय पोळी भाजून घेतली जाते. ना जतेचा विकास, ना प्रकल्प. असेच सध्याचे चित्र महाराष्ट्रात दिसतेय. हे कुठेतरी थांबले पाहिजे. एखादा प्रकल्प चांगला असेल तर प्रत्येकांने सहकार्य केले पाहिजे. नाहीतर कोणाचाच विकास होणार नाही. जग पुढे जात असताना आपण अधिक जोमाने मागे जाऊ.
पाहा काय म्हटले होते अजित पवार
ताजा कलम
अजित पवारांविरोधात विरोधी पक्ष रस्त्यावर उतरलेत. मात्र, तेही भान विसरलेत की, आपण काय करतोय? महाराष्ट्रात नेत्यांची अधोगती झालेली पाहायला मिळाली. शिवसेनेने औरंगाबदमध्ये (शिवांभू आंदोलन केले) तर मुंबईत दादरमध्ये मनसे या राजकीय पक्षांनी आंदोलनाची मर्यादाच ओलंडली. त्यांच्या सुपिक डोक्यातील शंका दिसून आली. आंदोलन करताना शालेय विद्यार्थ्याला पोस्टरवर लघुशंका करण्यास प्रवृत्त केले. आपण तरूण पिढीवर काय बिंबवतोय, याचे आंदोलन करणाऱ्या स्त्री-पुरूष मंडळींना भान राहिलेले नाही. यातून काय धडा घ्यायचा?
तर दुसरीकडे शिस्तीची भाषा करणारे शरद पवार पुतण्याला माफी देऊन मोकळे झाले. अजित पवारांच्या जागी दुसरा